जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाचोरा तालुक्यातील वाडी (शेवाळे) येथे शेतात बैल शिरल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यात झालेल्या हाणामारीत पुतण्याचा मृत्यू झाला आहे. पुनमचंद भोसले (वय ४३) असे मृत्यू झालेल्या पुतण्याचे नाव आहे. ही घटना २७ नोव्हेंबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या हाणामारीत जखमी असलेल्या यानंतर पुनमचंद भोसले यांना जळगावमधील गोदावरी हॉस्पीटलमध्ये गंभीररीत्या जखमी अवस्थेत दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी काका प्रल्हाद मोतीराम भोसले यांना अटक केली आहे.
काठीने मारहाण
बैल शेतात शिरल्याचा राग आल्याने प्रल्हाद मोतीराम भोसले यांनी पुतण्या पुनमचंद भोसले यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत पुनमचंद भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखावपत झाली. त्यानंतर त्याला कुटुंबियांनी तातडीने हॅास्पिटमध्ये दाखल केले. पण, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. बैल शेतात शिरल्याचा राग मात्र काकाला चांगलाच महागात पडला. पुतण्याचा मृत्यू व स्वताला अटक या छोट्याशा घटनेतून झाली.
Jalgaon Crime Farmer Fight Death Police