जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्याच्या सहकार विभागातील मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गळाला लागला आहे. यावल येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा लाचखोर अवसायक सखाराम कडू ठाकरे (५६) हा तब्बल पाच लाखाची लाच घेतांना रंगेहात सापडला आहे. पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम एका व्यक्तीच्या नावे वर्ग करून देण्यासाठी लाचखोर ठाकरेने लाच मागितली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सखाराम ठाकरे हा जळगाव येथे राहणारा असून तो विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया) धुळे येथे कार्यरत आहे. त्याच्याकडे अतिरिक्त कार्यभार विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक) जळगाव संस्था, जळगाव तथा अवसायक, श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड (यावल) हा सुद्धा आहे. नगरपरिषद सावदा येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम संबंधित व्यक्तीच्या नावे वर्ग करायची होती. त्यासाठी त्या व्यक्तीने लाचखोर ठाकरेशी संपर्क साधला. या कामासाठी ठाकरेने ५ लाखाची लाच मागितली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला आणि या सापळ्यात ठाकरे अडकला. पंचासमक्ष पाच लाख रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
सापळा अधिकारी –
अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
सापळा पथक-
पोनि हेमंत बेंडाळे, पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथक.
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक संपर्क क्रमांक – +919371957391
मा. श्री. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक. संपर्क क्रमांक – 9404333049
*मा.श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. संपर्क क्रमांक – +919822627288.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
Jalgaon Crime ACB Cooperative Trap Bribe Corruption
Savda Yaval Department Raid Anti