भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस तब्बल ५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात एकाचवेळी तीन लाचखोर सापडले आहेत. त्यात राहुल बाबासाहेब गायकवाड (पोलीस निरीक्षक, बाजारपेठ पोलीस ठाणे), पोलीस नाईक तुषार पाटील (बक्कल नंबर ३०३) आणि ऋषी दुर्गादास शुक्ला (खासगी एजंट, हनुमान वाडी, भुसावळ) यांचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मलकापूर येथील एका व्यक्तीवर बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर, या गुन्ह्यात आणखी एकास सह आरोपी न करण्यासाठी लाचखोर गायकवाड आणि पाटील यांनी तब्बल ५ लाखांची लाच मागितली. गायकवाड आणि पाटील यांनी ही रक्कम खासगी एजंट शुक्ला याच्या मार्फत मागितली. याच लाचेतील ३ लाख रुपयांची रक्कम देण्याचे निश्चित झाले. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर एजंट शुक्ला हा लाच घेताना रंगेहात सापडला आहे. त्यामुळे आता गायकवाड, पाटील आणि शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सापळा अधिकारी
अभिषेक पाटील पोलीस उप अधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे मो नं.8888881449
सहायक सापळा अधिकारी :-
पो. हवा .श्री राजन कदम
सापळा पथक*-
पो कॉ. संतोष पावरा
पो कॉ रामदास बारेला
पो. हवा चालक सुधीर मोरे
मार्गदर्शक* –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक- 02562224020 किंवा 8888881449
टोल फ्री क्रमांक १०६४ .