नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गोदावरी नदी पात्रात अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. जळगावचे दोन तरुण गोदावरी नदी पात्रात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नक्की कसा घडला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावचे दोन तरुण काही कामानिमित्त नाशिक शहरात आले होते. शुक्रवारी रात्री ते पंचवटी भागात आले. त्याचवेळी ते मोटारसायकलवरुन नदीपात्रालगत जात होते. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने हे दोघे तरुण मोटरसायकलसह गोदावरी नदीत पडले. त्यात या दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने मदत कार्य देखील मिळू शकले नाही. दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. पंचवटी कॉलेज समोर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)