जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अजिंठा चौकात रविवारी भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करून एका तरुणावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला छातीजवळ चाकू लागून तो तरुण जखमी झाला.
याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी चांगलाच व्हायरल झाला. त्यानुसार शनिवार ६ मे रोजी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान हॉटेल महेंद्राजवळ एक तरुण व एक तरुणीचा गोंधळ सुरू होता. काही वेळाने तरुणीने छोटा चाकू काढून तरुणाच्या छातीवर वार केला. चाकू लागल्याने तरुणाच्या छातीतून रक्ताची धार लागली. त्यामुळे तरुणाच्या अंगातील शर्ट पूर्ण लाल झाले होते.
तरीही तरुणी चाकू मारण्याचा प्रयत्न करीत होती. तो तरुण मात्र हातातून चाकू हिसकवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतू तरुणी आपल्या हातातील चाकूने पुन्हा पुन्हा वार करण्याचा प्रयत्न करीत होती. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरु होता. मात्र, या घटनेची पोलिस ठाण्यात याची कुठलीच नोंद नव्हती. त्यामुळे हे तरुण तरुणी नेमके कोण आणि कशावरून वाद सुरु आहे, याबाबत माहिती नाही. या प्रकरणाचा शोध स्थानिक पोलिस प्रशासन घेत आहे.