नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली दिलेल्या सुचनेनुसार तसेच बुधवारी संचालक, नागरी संरक्षण संचालनालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये उप नियंत्रकांना दिलेल्या आदेशान्वये जिल्हाधिकारी व नियंत्रक, नागरी संरक्षण, नाशिक यांचेमार्फत के.टी.एच.एम., कॉलेज, बोट क्लब मैदान, नाशिक येथे दिनांक ७ मे रोजी दुपारी ४ वाजता ऑपरेशन “अभ्यास” एक्सरसाइज घेण्यात येणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याच्या दृष्टीने Air Raid Warning आणि Black Out या बाबतीत Mock Drill घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी संरक्षण कार्यालयचे उपनियंत्रक अ.शि. जगताप यांनी दिली.