ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी गोळीबार झाला असून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला . आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारून फरार झाला. मात्र त्याला अटक करण्यात आली असून याप्रकरणी चौकशीसाठी तो सहकार्य करत नाही, असे आढळून आले आहे. तसेच तो नारेबाजी करीत आहे. या जवानाची कसून चौकशी सुरू असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
गोळीबारात चौघांचा मृत्यू
रेल्वे प्रवासा सुरक्षित समजला जातो, मात्र आता पालघर नजीकच्या घटनेमुळे रेल्वे प्रवासातही जीवाला धोका आहे, असे म्हणता येईल. रेल्वे प्रवासात चेतन सिंह नावाच्या आरसीएफ जवानाने प्रवाशांवर गोळीबार केला. यात चार जण जागीच ठार झाले, रजा नाकारल्यामुळे संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केले असे म्हटले जाते. त्याची मानसिक स्थिती ही चांगली नव्हती, परंतु या अंतर्गत वादामुळे प्रवाशांचा नाहक बळी गेला असे दिसून येते.जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर रेल्वे पोलिसांनी भाईंदरमध्ये चेतन सिंह याला ताब्यात घेतले. पालघर स्थानकाजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढलेल्या आपल्या वरिष्ठ आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर प्रवाशांनी ट्रेनची चेन खेचली असता ट्रेन मीरा रोड स्थानकाजवळ थांबली. त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शस्त्रांसह अटक करण्यात आली. मात्र गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही, चौकशीदरम्यान करतोय नारेबाजी आरोपी चेतन सिंहची चौकशी सुरू आहे. मात्र चौकशीत त्याची नारेबाजीची ‘नाटके ‘ सुरू आहेत.
प्रश्न विचारले असता
पालघरमधील नालासोपाऱ्याचा अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (४८) आणि बिहारच्या मधुबनी येथील असगर अब्बास शेख (४८) अशी दोन मृत प्रवाशांची रेल्वे पोलिसांनी ओळख पटवली आहे, तर अजुनही एकाची ओळख पटलेली नाही, तर दुसरीकडे आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनला सात दिवसांच्या सरकारी रेल्वे पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे, पण तो चौकशीत सहकार्य करत नाही. तसेच गोळीबाराशी संबंधित प्रश्न विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देतो. इतकेच नव्हे तर त्याने घोषणाबाजीही केली. या आरोपीला १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलीसांनी केली. मात्र, न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीच्या वकिलांनी आरोप केला की, घटनेनंतर २४ तासांपेक्षा जास्त काळ त्याला जेवण दिले नाही. त्यावर न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, पोलिसांनी चेतनला वेळेवर जेवण द्यावे. तो मानसिक दृष्टीने अशांत होता का, याचाही तपास सुरू आहे. रेल्वेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत आतापर्यंत १५ हून अधिक जणांचे जबाब घेण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
jaipur mumbai train firing rpf constable chetan kumar investigation police custody crime murder