बालाघाट (मध्यप्रदेश) – ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ या न्यूज पोर्टलचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार गौतम संचेती यांचे ज्येष्ठ बंधू जैनेद्र मोहनलाल संचेती (वय ६८) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मंगळवारी (२८ सप्टेंबर) रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या ३० वर्षांपासून ते मनमाडहून बालाघाट येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते. यांच्या पश्चात पत्नी हेमलता, मुलगा निखिल, मुलगी शिवानी तसेच बंधू जव्हेरीलाल, राजेंद्र आणि गौतम असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (२९ सप्टेंबर) सकाळी बालाघाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.