नाशिक – भारतीय जैन संघटने मार्फत जैन समाजातील सर्व पंथियांसाठी (वर्चुअल) वधू- वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विधवा, विधुर, घटस्फोटीत आणि विवाह इच्छुक अविवाहित युवक (वय वर्षे ३० पेक्षा जास्त) जे विधवा, घटस्फोटीत महिला उम्मीदवारा बरोबर विवाह करण्यास तयार असतील असे उम्मेदवार सहभागी होऊ शकतात. हा मेळावा रविवार २४ एप्रिल २०२२ रोजी झूम लिंक द्वारा आयोजित होईल.
BJS संघटनेचे संस्थापक शांतिलालजी मुथ्था यांच्या प्रेरणेने व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड, राष्ट्रीय संयोजक अनिल रांका यांच्या प्रयत्नाने वर्चुअल वधू-वर मेळावा जुलै २०२० पासून घेण्यात येत आहेत. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) BJS Connect या मोबाईल अँप (App) मार्फत करायची आहे. हे अँप आपण play store मधुन डाऊनलोड करून किंवा खालील दिलेल्या लिंक द्वारा https://bjscommunity.page.link/uns1HAZchmmA5DWY7 करू शकता.
इच्छुक उमेदवाराने स्वतःचे प्रोफाईल तयार करून या संमेलनासाठी रेजिस्ट्रेशन करायचे आहे. प्रोफाईल तयार केल्यावर रु ४९९/- (one time) रेजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे. परिचय संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी वेगळे चार्जेस आकारले जाणार नाहीत. नाव नोंदणीची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२२ आहे.
आजच रजिस्ट्रेशन करा. मोजकेच जागा शिल्लक आहेत. अधिक माहितीसाठी भारतीय जैन संघटनेच्या मुख्य कार्यालय ०२०-६६०५०२२० या नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन नंदकिशोर साखला – राज्य प्रभारी, दिपक चोपडा- विषय प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.