नाशिक – जैन ओसवाल बोर्डींगच्या प्रबंध समितीच्या १० जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. व्हि.एन. नाईक हायस्कुल येथे या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरु होती. सहा राऊंडमध्ये झालेल्या मतमोजणीत प्रगती पॅनलने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली व ती शेवटच्या राऊंडपर्यंत कायम होती. या निवडणुकीत प्रगती व चैतन्य ही दोन पॅनल आमने – सामने उभी होती. दोघांनी जोरदार प्रचार केला होता. पण, या निवडणुकीत प्रगती पॅनलला मतदारांनी पसंती दिली. या निवडणुकीत प्रगती पॅनलचे नविन बंब, विनोद बेदमुथा, सोहनलाल भंडारी, सुनील भटेवरा, सुनील बुरड, डॅा. दिलीप खिंवसरा, रविंद्र पारख, शशिकांत पारख, अशोक सांखला, विजय टाटीया हे उमेदवार विजयी झाले आहे.