नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्नाटकमध्ये जैन साधूच्या हत्येच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, लासलगाव सह विविध ठिकाणी घटनेचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला. हिरेकोंडी या गावातील आश्रमात वास्तव्यास असलेले जैन साधू कामकुमार नंदी यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
हा प्रकार निंदनीय असून आज कोणत्याही धर्मातील साधू-मुनी सुरक्षित नाही. जैन साधुच्या हत्येमुळे देशभरातील जैन बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे हत्या करणा-या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन यावेळी देण्यात आले.
देशभर निषेध
संत प.पू.आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांची निर्घृण हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण जैन समाजाने निषेध केला आहे.. कामकुमारनंदीजी महाराज यांची हत्या हिरेकूडी (ता.चिकोडी कर्नाटक) येथे झाली. जैन धर्माचे साधू संत यांची हत्या होण्याचे प्रमाण वाढत आहे. काही साधू संतांचा विहार करीत असताना वाहने अंगावर घालून हत्या करण्यात आली. जैन समाजाच्या साधू संतांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जैन समाजाची आहे. या घटनेकडे व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २० जुलै रोजी देशभर निषेध व्यक्त केला जात आहे.