नाशिक : शहरातील बहुचर्चित श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या अध्यक्षपदी सोहनलाल भंडारी, तर सेक्रेटरीपदी शशिकांत पारख यांनी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली. श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या अन्य पदाधिकारी नियुक्तीत खजिनदारपदी अशोक साखला, उपाध्यक्षपदी सुनील बुरड, दिलीप खिंवसरा, सुनील भटेवरा, विजय टाटीया, तर, सहसेक्रेटरीपदी विनोद बेदमुथा, रवींद्र पारख, नवीन बंब यांची नियुक्ती करण्यात आली.