नाशिक : राष्ट्रसंत आचार्य पुलक सागर यांचे नाशिकच्या सीमेवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी नाशिक येथून २४ पेक्षा अधिक गाड्यांमध्ये शंभरपेक्षा अधिक भाविक पोहोचले होते. यावेळी भाविकांकडून पुलक सागर गुरुदेव यांना श्रीफळ देवून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सकल जैन समाजातील सर्व सदस्यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा केली होती. नाशिक ढोलाच्या गजरात मोठा उत्साहत गुरुदेव यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, गजपंथा तिर्थक्षेत्र येथे गुरूदेवचे ८ एप्रिल गुरुदेवचे भव्य स्वागत तसेच ९ एप्रिल प्रवचन आहे. तसेच १० एप्रिल रोजी नासिक सिटी आर. के. स्थानक मध्ये प्रवचन असणार आहेत. तर ११ ते १४ एप्रिल दरम्यान नाशिक नगरीत धनदाई लॉन्स वर ज्ञान गंगा महोत्सव भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त ज्ञान गंगा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात अधिकाधिक समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प.पु आचार्य पुलक सागरजी ज्ञान गंगा महोत्सवाचे सकल जैन समाजचे अध्यक्ष सुमेरकुमार काले व जैन सेवा संघ चे अध्यक्ष महेशभाई शहा, पवन पाटणी, आरएमडी हॉस्पिटलचे अध्यक्ष नंदकुमार पारख तसेच अशोक साखला व जे.सी. भंडारी, मोहनलाल लोढा समितीकडून करण्यात आले आहे.