नाशिक – व्दारका येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष महेंद्रभाऊ बोरा यांची जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. धार्मिक व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे बोरा यांनी विविध संस्थेत पदे भूषविली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांची व्दारका श्री वर्धमान श्री श्रावक संघ, जैन सोशल ग्रुप (ग्रेप सिटी) , या संस्थेसह बंसीलाल मुथा, रंगलालजी संघवी, मोतीलाल चोरडीया, पारसमलजी लोढा, खुबचंदजी बागमार, पारसमलजी अलीझाड, संतोषभाऊ संकलेचा, निलेशभाऊ मुनोत यांनी अभिनंदन केले आहे.