इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस अडकली आहे. याप्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय तिच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. नुकत्याच झालेल्या सुनावणीत तिच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जॅकलीनला देश सोडून जायचे होते, पण नियंत्रण रेषेच्या समस्येमुळे तिला ते शक्य झाले नाही, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली. दरम्यान, या सुनावणीत न्यायालयाने जॅकलीनला दिलासा दिला आहे. आता याप्रकरणी पुढची सुनावणी १० नोव्हेंबरला होणार आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत ईडीने जॅकलीनला जामीन देण्यास विरोध केला. जॅकलीनने सुकेश चंद्रशेखर याच्याकडून अनेक भेटवस्तू घेतल्या. पैसेही घेतले, कुटुंबियांना दिले. यासोबतच तिने पुराव्यांशी छेडछाड केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तिच्या चौकशीदरम्यान तिने मोबाईलमधील डेटा डिलीट करून देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण नियंत्रण रेषेच्या नियमांमुळे हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. जॅकलीनने तपासात कधीच सहकार्य केले नाही. इतर आरोपींसमोर बसवून चौकशी केल्यानंतर तिने केवळ कबुली दिल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या कारणांमुळेच जॅकलीनला जामीन देण्यास ईडीने विरोध केला आहे. पुरावे तसेच साक्षीदारांना नुकसान पोहोचवण्याचा तिचा इरादा असल्याचे ईडीने न्यायालयात म्हटले आहे.
Jacqueline Fernandez Money Laundering Case Investigation