मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट कळाली नाही तर आपण पुन्हा – पुन्हा सांगतो, तेव्हा तुला १७ वेळा सांगूनही ऐकू येत नाही का? समजत नाही का? किंवा असे म्हटले जाते की, त्याला मी १७ वेळा सांगितले तरी त्याला कळले नाही. म्हणजे १७ हा शब्द अनेक वेळा आपल्या बोलण्यातून येतो. एखाद्याला जर आपण १७ वेळेस थप्पड मारली तर काय होईल ? परंतु असा किस्सा घडला आहे आणि तोही चित्रपट सृष्टीत दोन जिगरी दोस्तामध्ये? कोण आहेत हे दोन मित्र…
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि जॉकी श्रॉफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या चित्रपटांनी आणि वेगळ्या शैलीने एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. अनिल कपूरनेही आपल्या करिअरमध्ये जॅकी श्रॉफसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या जशी सलमान-शाहरुख आणि रणवीर सिंग-अर्जुन कपूर ही जोडी पडद्यावरची सर्वोत्कृष्ट मानली जाते, तशीच अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफची जोडीही त्या काळात सिनेमात मोठा बदल घडवून आणण्यासाठी पुरेशी होती. पण दोघांमध्ये एक वेळ अशी आली, जेव्हा जॅकी श्रॉफने अनिल कपूरला सलग १७ वेळा थप्पड म्हणजेच थापड मारली होती.
अनिल कपूरशी संबंधित या गोष्टीचा खुलासा खुद्द जॅकी श्रॉफने केला आहे. अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफची ही घटना ‘परिंदा ‘ च्या शूटिंगदरम्यान घडली होती. चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जॅकी श्रॉफने सांगितले होते की, एका शॉटसाठी त्यांनी एका मित्राला सुमारे १७ वेळा कशी थप्पड मारावी लागली. कारण ‘परिंदा’ चित्रपटात जॅकी श्रॉफने अनिल कपूरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक सीन होता ज्यामध्ये तो अनिल कपूरला थप्पड मारतो.
जॅकीने या शॉटसाठी अनिल कपूरला थप्पड मारली, जी दिग्दर्शकानेही मान्य केली. पण स्वतः अनिल कपूरला हा शॉट आवडला नाही आणि त्याला त्यात आणखी चांगला शॉट द्यायचा होता. याबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाला होता की, “त्याला दाखवायचे होते की, त्याला त्याच्या मोठ्या भावाने चांगली थप्पड मारली होती. पहिला शॉट ठीक होता आणि हावभावही चांगले होते, पण अनिलने ते नाकारले आणि तो म्हणाला की, मला आणखी एक शॉट हवा आहे, म्हणून मी त्याला पुन्हा मारले. पण तरीही त्याचे समाधान झाले नाही. त्या शॉटमुळे मला त्याला सुमारे १७ वेळा थप्पड मारावी लागली. मला ते करायचे नव्हते, पण तरीही मला ते करावे लागले.