हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) – बाहुबली चित्रपटातील धबधब्यांची मोहिनी सर्वांनाच आहे. मात्र, पेठ तालुक्यातील शेवखंडी येथील बुरुंडी हा धबधबा जणू बाहुबली चित्रपटातील असल्याचाच भास होतो आहे.
अतिशय निसर्गरम्य वातावरणात हा धबधबा आहे. नाशिक शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर हरसूल जवळील शेवखंडी येथे सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. त्यामुळेच बाहुबली फेम बुरुंडी धबधबा अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे.
नाशिक नेचर – भाग ३
फोटो आणि व्हिडिओ – संदिप बत्तासे, हरसूल
#NashikNature #AmazingNashik
#UnravelNashik #TouristDestination #WonderfulTouristSpot