इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने २०२५-२६ साठी प्राप्तिकर विवरणपत्रे (ITRs) भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ वरून १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उपयुक्ततेमध्ये बदल करण्यासाठी, ई-फायलिंग पोर्टल १६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२:०० ते पहाटे ०२:३० पर्यंत देखभाल मोडमध्ये राहील अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.
२०२५-२६ साठी प्राप्तिकर विवरणपत्रे (ITRs) भरण्याची अंतिम तारीख, जी मूळतः ३१ जुलै २०२५ रोजी होती, ती १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानंतर आता एक दिवस वाढ करण्यात आली आहे.
सोमवारी शेवटचा दिवस असल्यामुळे लाखो वापरकर्त्याने आयकर विभागाच्या ई – फायलिंग वेबसाईटवर प्रचंड ट्रॅफिक केली. तांत्रिक समस्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कारणास्तवर ही अंतिम मुदतीत एक दिवसाची वाढ करण्यात आली. १५ सप्टेंबर पर्यंत ७.३ कोटींहून अधिक आयटीआर दाखल झाले आहे.