नाशि – शिकाऊ उमेदवारी या योजनेंतर्गत ४ ऑक्टोबर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्र्यंबकरोड, सातपूर, नाशिक येथे सकाळी ९.३० वाजता हा मेळावा होईल. त्या अनुषंगाने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार रमाकांम उनवणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, सदर भरती मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड, १०वी ची व सर्व सत्रांची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह दिलेल्या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर, नाशिक येथे उपस्थित रहावे, असे ही सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार रमाकांम उनवणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.