नवी दिल्ली – भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी, रोपर ने सी पॅप (CPAP) या उपकरणाला पर्याय ठरू शकेल असे ‘जीवन वायू’ हे उपकरण विकसित केले आहे. हे देशातील असे पहिलेच उपकरण आहे ज्याला विद्युत पुरवठ्याची आवश्यकता नसल्यामुळे प्राणवायू निर्मिती संच म्हणजेच ऑक्सिजन सिलेंडर तसेच ऑक्सीजन पाइपलाइन या रुग्णालयातील उपकरणांना जोडता येऊ शकेल. सध्याच्या CPAP उपकरणाला ही सुविधा नाही.
आकृती एक : वीस सेंटीमीटर पर्यंतचा कंटिन्यूअस H2O प्रेशर आणि 60 LPM पर्यंत गतीमान फ्लो रेट देणाऱ्या थेरपी साठी जीवन वायू ब्रीदिंग सर्किट.
कंटीन्यूअस पॉझिटिव्ह एअर वे प्रेशर म्हणजेच CPAP ही स्लीप अप्निया या झोपेतील श्वसनसंबंधीत समस्या असणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. श्वासोच्छवास सुलभ होण्यासाठी हवेच्या हलक्या दाबाचा उपयोग करून श्वसन मार्ग मोकळे ठेवण्याची पद्धत या उपकरणात वापरली जाते. ज्यांची फुफ्फुसे संपूर्ण विकसित झालेली नाही अशा शिशूवरील उपचारासाठीही हे उपकरण वापरले जाते. फुफ्फुसे व्यवस्थित विकसित झालेली नसलेल्या नवजात शिशूंच्या फुफ्फुसांना हवेने फुगवण्यासाठी म्हणून या उपकरणाद्वारे अशा शिशूंच्या नासिकेत या मशिनद्वारे हवा सोडली जाते. covid-19 संसर्गाच्या प्राथमिक स्तरावर ही उपचार पद्धती उपयोगी पडते . फुफ्फुसांची हानी न होण्यासाठी तसेच फुप्फुसांना सूज आली असेल ती सूज कमी करण्यासाठी रुग्णांना या उपचार पद्धतीची मदत होते.
आकृती दोन : जीवन वायूची फ्लो पॅरामीटर्स वापरून संगणकावर तयार केलेली CAD आकृती
वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक सर्व मापदंड वापरून गळती पासून सुरक्षित असणारे तसेच प्राणवायू पुरवठा सक्षम रितीने करणारे कमी खर्चिक उपकरण ‘जीवन वायू’ हे CPAP सर्किट ट्युब असणारे उपकरण आहे. ते प्राणवायू नलीकेच्या आकारानुसार बनवताही येऊ शकते. वीजेशिवाय चालवता येत असल्यामुळे पेशंटला दुसरीकडे हलवताना याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
आकृती तीन : जीवन वायूची फ्लो पॅरामीटर्स वापरून केलेले 3D प्रिंटींग प्रोटोटाईप
“रुग्णांना प्राणदायक ठरणाऱ्या जीवरक्षक प्रणाली किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यासारख्या वैद्यकीय उपकरणांसाठी वीज पुरवठा हा मुख्य भाग असल्यामुळे सध्याच्या कोविड महामारीच्या कालखंडात अशा तऱ्हेचे उपकरण आवश्यकच होते” असे धातु विज्ञान आणि पदार्थ अभियांत्रिकीच्या सहयोगी प्राध्यापक खुशबू राखा यांनी म्हटले आहे. आयआयटी रोपर येथील ऍडव्हान्स मटेरियल्स आणि डिझाइन लॅब मध्ये हे उपकरण त्यांनी विकसित केले आहे.
यामध्ये सुरुवातीलाच हवा आत घेण्यासाठी फिल्टर आहे त्याची विषाणू रोधी परीणामकता 99.99% आहे अशी खात्री डॉक्टर राखा यांनी दिली आहे. वातावरणातून कोणतेही रोगजंतू आत प्रवेश करणार नाही असा विषाणू फिल्टर यात आहे. थ्री डी प्रिटिंग तंत्रज्ञान वापरून हे उपकरण तयार केले आहे आणि त्याची तांत्रिक चाचणी झालेली आहे.
जीवन वायू हे उपकरण 20 cm पर्यंतचे H2O पॉझिटिव्ह प्रेशर कायम राखतानाच हाय फ्लो ऑक्सीजन म्हणजे 20 ते 60 एल पी एम ऑक्सीजन पोचवू शकते . हे उपकरण 40% हून जास्त FiO2 आणिH2O चे PEEP (positive end-expiratory pressure) ठेवू शकते.
डॉक्टर खुशबू राखा आणि त्यांच्या चमूने रॅपिड प्रोटोटाइपिंग लॅब या चंदिगडच्या पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधील सिमेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या फॅकल्टी इन्चार्ज सुरेश चंद यांच्या सहकार्याने थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाची मदत घेऊन हे उपकरण तयार केले आहे. हे उपकरण वैद्यकीय चाचण्या तसेच मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी तयार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!