नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल ३०० कर्मचाऱ्यांना कंपनीने नोकरीवरुन काढून टाकले आहे. या मोठ्या निर्णयाचे प्रमुख कारण म्हणजे, हे ३०० कर्मचारी विप्रो कंपनीलाच फसवत होते. याला आयटी क्षेत्राच्या भाषेत मूनलायटींग असे म्हणतात. हे कर्मचारी विप्रोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचीही कामे करीत होते.
विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी ही माहिती दिली आहे. एका कार्यक्रमादरम्यान प्रेमजी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत आम्ही ३०० जण ओळखले आहेत जे एकाच वेळी दुसर्या कंपनीत सेवा देत होते. या लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मूनलायटींगच्या प्रकारामुळे प्रथमच आयटी कंपनी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. याआधी विप्रोचे चेअरमन ऋषद प्रेमजी यांनी कर्मचाऱ्यांच्या मूनलायटींगला कंपनीची फसवणूक म्हटले होते.
आयटी व्यावसायिकांमध्ये मूनलायटींगच्या वाढत्या ट्रेंडने उद्योगात नव्या वादाला तोंड फोडले आहे. अलीकडेच इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत मेलद्वारे मूनलायटींगबाबत इशारा दिला होता. त्याचबरोबर आयबीएम आणि टीसीएसनेही मूनलायटींगबाबत आक्षेप घेतला आहे.
मूनलायटींग म्हणजे
जेव्हा एखादा कर्मचारी पैसे मिळवण्यासाठी त्याच्या नियमित नोकरीशिवाय इतर काम करतो, तेव्हा त्याला तांत्रिकदृष्ट्या मूनलायटींग म्हणतात. कोरोनाच्या काळात त्याचा ट्रेंड वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, आयटी कंपन्यांमध्ये घरून काम केल्यामुळे कर्मचाऱ्यांना मूनलायटींगची संधी मिळाली.
IT Giant Wipro Fires 300 Employees Moonlighting
IT Industry
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD