नाशिक – उद्योग मित्र संस्था आणि पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील INFOVISION LABS आयटी कंपनीसाठी रामकृष्ण आयटी कन्सल्टिंग द्वारे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला. यामध्ये १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात ज्यांची शैक्षणिक पात्रता, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील बी.ई. अथवा MCA, MSC(Comp.Sc.) इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण झालेला किंवा शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी या मुलाखतीस पात्र होते.
INFOVISION LABS पुणे या आयटी कंपनीत तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र दिले व ५२ विद्यार्थ्यांना ईटरव्ह्युवची पुन्हा तयारी करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला. निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यी असे पिव्हीजी इंजिनिअरींग कॅालेज नाशिकचे अनुश्री मोरे व जसविंदर कौर देवे आणि के.के.वाघ कॅालजचा शिवम चांदवडकर यांना INFOVISION LABS चे ग्लोबल हेड मुकुंद वांगीकर यांच्याकडून कंपनीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. सहा महिन्याचे प्रशिक्षण (वर्क फ्रॉम होम विचारात घेऊन.) दिले जाईल.नया सहा महिन्याच्या प्रशिक्षणात मानधन सुद्धा दिले जाणार आहे. त्यानंतर पगार वार्षीक साडेचार लाख + १ लाख देण्यात येईल. उद्योग मित्र संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पेशकार व समन्वयक अमित कुलकर्णी तसे पी व्ही जी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग प्राचार्य ए.आर.रासने, व प्रा.संदीप दिवे यांनी हा कॅम्पस इंटरव्ह्यु व आयोजीत केला होता. आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी पुन्हा असेच विवीध कंपन्यांचे कॅम्पस ईटरव्ह्युव आयोजीत करणार आहोत अशी माहिती प्रदीप पेशकार यांनी दिली.