मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताने एकाच महिन्यात चंद्रावर आणि सूर्यावर यान पाठवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. पण आता भारतीय शास्त्रज्ञांनी समुद्राच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची पूर्ण तयारी झाली असून त्याला ‘मत्स्य ६०००’ असे नाव देण्यात आले आहे. समुद्राचा तळ गाठण्याच्या या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चेन्नईमधील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी) या मोहिमेवर जाण्यासाठी सबमर्सिबल तयार केले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ‘मत्स्य ६०००’ सबमर्सिबलमध्ये समुद्राच्या खाली तीन माणसांसह सहा हजार मीटरपर्यंत जाण्याची क्षमता आहे. सुरुवातीला ६०० मीटर समुद्राच्या खाली जाऊन याच्या प्रवासाची सुरुवात होईल. सबमर्सिबलमुळे समुद्राच्या परिसंस्थेला कोणताही त्रास होणार नसल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.
बंगालच्या सागरात चाचणी
२०२४ साली बंगालच्या सागरात ‘मत्स्य ६०००’ची चाचणी घेण्यात येणार आहे. ‘एनआयओटी’चे संचालक जी. ए. रामदास ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाले की, मत्स्य ६००० हे समुद्रयान गोल आकाराचे असून, त्याचा व्यास २.१ मीटर आहे. ८० एमएमच्या जाड थर असलेल्या टायटॅनियम मिश्र धातूपासून ही सबमर्सिबल बनवण्यात आली असून, समुद्राच्या सहा हजार मीटर खोलीवर ६०० पटींनी अधिक दबाव ती सहन करू शकते.
टायटनपासून घेतला धडा
काही दिवसांपूर्वीच टायटन सबमर्सिबलचा पाण्याखाली अपघात झाला होता. सबमर्सिबलमध्ये उपस्थित असलेल्या पाचही अब्जाधीश प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. मृतांमध्ये टायटन सबमर्सिबलची मालकी असलेल्या ओशनगेटच्या सीईओंचाही समावेश होता. ‘टायटन’ची दुर्घटना घडल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी ‘मत्स्य’च्या रचनेचा पुन्हा एकदा आढावा घेतला आहे. ‘मत्स्य ६०००’ सलग १२ ते १६ तास काम करू शकते किंवा प्रवास करू शकते आणि त्यामध्ये ९६ तास चालेल इतका ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे.
Next is “Samudrayaan”
This is ‘MATSYA 6000’ submersible under construction at National Institute of Ocean Technology at Chennai. India’s first manned Deep Ocean Mission ‘Samudrayaan’ plans to send 3 humans in 6-km ocean depth in a submersible, to study the deep sea resources and biodiversity assessment. The project will not disturb the ocean ecosystem. The Deep Ocean Mission supports the ‘Blue Economy’ vision of PM narendra modi ji, and envisages sustainable utilization of ocean resources for economic growth of the country, improve livelihoods and jobs, and preserve ocean ecosystem health.
ISRO Samudrayaan MATSYA 6000 Mission Ocean