सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिमानास्पद! चांद्रयान ३चे यशस्वी उड्डाण… इस्रो शास्त्रज्ञांसह देशवासियांचा जल्लोष…

जुलै 14, 2023 | 12:03 pm
in इतर
0
F0 IMc1aUAIv4C9

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज मोठा इतिहास रचला आहे. कारण, बहुप्रतिक्षित चांद्रयान-३ या मोहिमेचे आज दुपारी २.३५ वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. यानाने चंद्राकडे झेप घेतली आहे. हे यान पुढील महिन्याच्या अखेरीस चंद्रावर उतरणार आहे.

चांद्रयान ३चे काऊंटडाऊन संपताच आगीच्या ज्वाळा बाहेर आल्या आणि यानाने अवकाशात उड्डाण केले. त्याचवेळी शास्त्रज्ञांसह देशवासियांनी एकच जल्लोष केला. शिट्ट्या, टाळ्या आणि भारत माता की जय अशा घोषणांनी सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला.

चांद्रयान३ मोहिमेची तारीख यापूर्वी १२ ते १९ जुलै दरम्यान निश्चित करण्यात आली होती. चांद्रयान-३ चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. अंतराळ क्षेत्रात भारताचे हे आणखी एक मोठे यश आहे, अशी प्रतिक्रीया इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली आहे.

🚀@isro launches LVM3-M4/#Chandrayaan3 Mission from Satish Dhawan Space Centre (SDSC) SHAR, Sriharikota 🇮🇳

Chandrayaan-3 is a follow-on mission to Chandrayaan-2 to demonstrate end-to-end capability in safe landing and roving on the lunar surface.@IndiaDST pic.twitter.com/9wVAtkPCfw

— PIB India (@PIB_India) July 14, 2023

चांद्रयान-२ नंतर हे मिशन चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंगसाठी पाठवले जात आहे. चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाली. त्याचा लँडर पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकला आणि त्यानंतर त्याचा पृथ्वीच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तीच अपूर्ण मोहीम पूर्ण करण्यासाठी चांद्रयान-३ पाठवण्यात आले आहे.

इस्रोच्या अधिकार्‍यांच्या मते, चांद्रयान-३ मोहीम चांद्रयान-२ चा पुढचा टप्पा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चाचण्या घेईल. हे चांद्रयान-२ सारखे दिसेल, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असेल. चांद्रयान-३ चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. अल्गोरिदम सुधारले आहेत. चांद्रयान-२ मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलेल्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

यापूर्वी, राष्ट्रीय अंतराळ संस्थेने सांगितले होते की, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये चांद्रयान-३ असलेली एन्कॅप्स्युलेटेड असेंबली LVM3 सोबत जोडली गेली होती. या मोहिमेमुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँड करणारा भारत हा जगातील चौथा देश बनणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उत्तरेत कोसळतोय तरीही अनेक राज्यात पावसाची प्रतिक्षाच… देशात सध्या एवढा आहे पाणीसाठा

Next Post

संतापजनक! पर्यटक महिलेवर ८ नराधमांचा आळीपाळीने बलात्कार… सत्ताधारी आमदाराचा पोलिस ठाण्यात ३ तास ठिय्या… अखेर गुन्हा दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! पर्यटक महिलेवर ८ नराधमांचा आळीपाळीने बलात्कार... सत्ताधारी आमदाराचा पोलिस ठाण्यात ३ तास ठिय्या... अखेर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011