इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अहमदाबादहून सूरजपूरला जात असताना बेपत्ता झालेला इस्रोचा तरुण शास्त्रज्ञ अखेर पुरीमध्ये सापडला आहे. मागील सात दिवस या शास्त्रज्ञाचा शोध घेतला जात होता. अखेर ओडिशातील पुरी रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी शास्त्रज्ञाला ताब्यात घेतले आहे. कारण विसरत शास्त्रज्ञ व्यक्त किंवा गायब झाल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली होती त्यामुळे त्याचा शोध घेण्यात येत होता.
इस्रो ही भारतातील सर्वात मुख्य अंतराळ संशोधन संस्था आहे. इस्रो ची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आली व इस्रोचे मुख्यालय बेंगलोर येथे स्थित आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्य देशभरातील विविध केंद्रांमधून संचलित होत असते. आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा जेवढा विकास झाला आहे त्याचे श्रेय केवळ इस्रो या संस्थे लाच जाते.
भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला अधिक मजबूत बनविण्याकरिता आणि अंतराळ संशोधनाच्या विकासामध्ये इस्रोचे मोठे योगदान आहे. इस्रो या संस्थेची स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई यांनी 15 ऑगस्ट 1969 रोजी केली. भारतामधील तंत्रज्ञानामध्ये जी काही प्रगती घडून आली त्यामागे इस्रोचा खूप महत्वाचा वाटा होता. इस्रो ही भारत सरकारची अंतराळ संघटना असून ती अवकाश संबंधित संशोधन करत असते. तसेच इस्रो उपग्रह आणि तंत्रज्ञानाची निर्मिती देखील करते.
इस्रो च्या माध्यमातून संशोधित केल्या गेलेल्या अनेक तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या विकासासाठी आणि देशातील इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. देशाच्या सुरक्षित ते त्याच्या बाबतीत देखील महत्त्वाची भूमिका बजावते. भारताला अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा प्रदान करण्याचे काम इस्रो कडे असते. दरम्यान एक शास्त्रज्ञ रक्षाबंधन सण साजरा करून तो आपल्या गावी परतत होता. पोलीस त्याच्या मोबाईल तसेच बँक खात्यातून पैसे काढण्यावर पाळत ठेवून होते.
याचदरम्यान बेपत्ता शास्त्रज्ञाने एटीएममधून त्याच्या खात्यातून पैसे काढले. नेमका याचवेळी शास्त्रज्ञाचा ठावठिकाणा लागला आणि पोलीस पथकाने तेथे जाऊन त्या शास्त्रज्ञाला ताब्यात घेतले. आठवडाभराच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना त्याचा थांगपत्ता लावण्यात यश मिळाले. पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे शास्त्रज्ञाचा शोध लागल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. एटीएममधून पैसे काढल्याचा संदेश मोबाईलवर येताच कुटुंबीयांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी ओडिशा पोलिसांच्या मदतीने शास्त्रज्ञाला ओडिशाच्या पुरी रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतले. दीपक पाईक्रा (27) असे शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते सूरजपूर जिल्ह्यातील लाटोरी चौकीअंतर्गत कास्केला गावातील रहिवासी आहेत. ते 2018-19 पासून इस्रो अहमदाबादमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्त आहेत.
दिपक हे 5 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी अहमदाबादहून त्यांच्या गावी कास्केला येथे आले होते. 6 ऑगस्ट रोजी शास्त्रज्ञ नागपुरात पोहोचल्याची माहिती मिळाली. मात्र तेव्हापासून त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे सर्वच जण चिंतेत सापडले होते. दीपक यांच्या जीविताचे काही बरे-वाईट तर घडले नाही ना, अशी काळजी कुटुंबियांना वाटत होती.
शास्त्रज्ञ दीपक यांचे शेवटचे लोकेशन ओडिशातील पुरी येथे असल्याचे सांगितले जात होते. दीपक हे गायब असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक रामकृष्ण साहू यांच्या सूचनेवरून लाटोरी पोलिसांचे पथक कुटुंबीयांसह पुरी येथे पोहोचले होते. बेपत्ता शास्त्रज्ञ दीपक हे हॉटेल ब्लू मूनमध्ये थांबले होते, परंतु ते हॉटेलमध्ये कुणाला काही न सांगता निघून गेले होते, असे पुरीमध्ये पोहोचलेल्या पोलीस पथकाच्या निदर्शनास आले होते.
त्यानंतर दि. 8 ऑगस्टपासून मोबाईल बंद असल्याने शास्त्रज्ञ दीपक यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर एकेदिवशी दुपारी अडीच वाजता दीपक यांनी त्यांच्या खात्यातून तीन हजार रुपये काढले. त्यानंतर घरच्यांना मोबाईलवर मेसेजद्वारे याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी तत्काळ लातोरी चौकीचे प्रभारी धनंजय पाठक यांना माहिती दिली. त्यानंतर चौकीच्या प्रभारींनी तत्काळ ओडिशाच्या सी-बीच स्टेशन, पुरीच्या प्रभारींना याची माहिती दिली. माहिती मिळताच पुरी सी-बीच स्टेशन प्रभारी तात्काळ टीमसह घटनास्थळी गेले आणि त्यांनी बेपत्ता शास्त्रज्ञ दीपक यांना पुरी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे.
ISRO Missing Scientist Found Police Search Operation
Crime