पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) ने JRF, RA आणि संशोधन वैज्ञानिक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इस्रोच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार nrsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात तसेच अर्ज करू शकतात. इस्रोच्या या भरती मोहिमेत एकूण 55 पदांवर पात्र उमेदवारांची निवड करायची आहे.
एकूण पदे :
इस्रोच्या या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मे 2022 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर अटी खालीलप्रमाणे आहेत-
ज्युनियर रिसर्च फेलो: 12 पदे
संशोधन शास्त्रज्ञ: 41 पदे
संशोधन सहयोगी: 2 पदे
शैक्षणिक पात्रता:
JRF साठी ME/M.Tech in Remote Sensing किंवा GIS किंवा Remote Sensing आणि GIS किंवा BE किंवा B.Tech in Civil Engineering किंवा MSc in Agriculture. तर रिसर्च सायंटिस्टसाठी उमेदवाराने ME किंवा M.Tech in Remote Sensing किंवा GIS असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार संपूर्ण भरती अधिसूचना पाहू शकतात.
NRSC या भरतीमधील उमेदवारांच्या निवडीसाठी संगणक आधारित चाचणी घेऊ शकते. या परीक्षेचा उद्देश पात्र उमेदवारांची निवड करणे हा असेल. CBT मध्ये मिळालेल्या गुणांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही. अंतिम निवड मुलाखतीवर आधारित असेल. अधिक माहितीसाठी nrsc.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.