पुणे – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये नोकरी मिळवण्याची तरुणांना उत्तम संधी आहे. याकरिता इस्रोने कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण 16 पदांवर नियुक्ती होणार आहे.
उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट iirs.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार अर्ज करावा. कारण फॉर्ममध्ये काही विसंगती आढळली तर अर्ज नाकारला जाईल.
इस्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रत्येक पोस्टसाठी एक विशिष्ट पोस्ट कोड निर्धारित करण्यात आला आहे. तसेच मुलाखतीच्या तारखा पोस्ट कोडनुसार दिल्या जातात. उमेदवारांची मुलाखत व परिक्षा दि. 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान होईल. मुलाखतीच्या तारखा उमेदवार अधिकृत अधिसूचनेद्वारे तपासू शकता.
तसेच उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, JRF च्या संहितेनुसार, वॉक-इन मुलाखतीसाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे- IIRS सिक्युरिटी रिसेप्शन, IIRSISRO/DOS, 4 कालिदास रोड, देहरादून- 248001. तसेच उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, मुलाखतीसाठी जाताना त्यांनी अर्जाची प्रत त्यांच्या साक्षांकित कागदपत्रांसह सोबत ठेवावी.