इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चांद्रयान-३ च्या यशानंतर, भारताने सूर्याकडे रोख वळवला आहे. त्यासाठी मिशन आदित्य-L1 टे प्रक्षेपण आज करण्यात आले आहे. भारताच्या या सूर्य मोहिमेबाबत भारतासह संपूर्ण जगात उत्सुकता वाढली आहे. या मिशनच्या शुभारंभाची सर्व जण खूप वाट पाहत होते.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले की, आदित्य-L1 चे प्रक्षेपण यशस्वीरित्या झाले आहे. आज, शनिवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
आदित्य L-1 चे प्रक्षेपण दाखवण्यासाठी इस्रोने विशेष व्यवस्था केली. संस्थेने आपल्या वेबसाइटवर श्रीहरिकोटा येथील केंद्रातून आदित्य एल-1 लाँच लाइव्ह पाहण्यासाठी व्ह्यू गॅलरी सीट्स बुक करण्याचा पर्याय दिला होता. मात्र, यासाठी मर्यादित जागा होत्या, त्या नोंदणी सुरू झाल्यानंतरच भरण्यात आल्या.
बघा, आदित्य-L1च्या उड्डाणाचे थेट प्रक्षेपण
चांद्रयान-३ च्या यशानंतर काही दिवसांनी, भारताने शनिवारी आपली पहिली सूर्य मोहीम ‘आदित्य L-1’ लाँच केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या PSLV रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी, ‘आदित्य एल-1’ ला पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर असलेल्या ‘लॅग्रेन्जियन-१’ बिंदूवर पोहोचण्यासाठी १२५ दिवस लागतील.
आदित्य L-1 ला Lagrangian point 1 (L1) पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे चार महिने लागतील. या कालावधीत ते १५ लाख किलोमीटरचे अंतर पार करेल. चांद्रयान-३ प्रमाणेच तेही वेगवेगळ्या कक्षेतून पुढे जाईल आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचेल. म्हणजेच आदित्य एल-१ देखील थेट पाठवला जाणार नाही.
ISRO Indian Solar Mission AdityaL1 Launching Today
Live Telecast Space