नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांद्रयान३ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या प्रज्ञान रोव्हर बाहेर येण्याचे. आणि अखेर तो क्षण यशस्वी झाला आहे. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर हे बाहेर आले आणि त्याने यशस्वीरित्या चंद्रावर वॉक सुरू केला आहे. तशी घोषणा भारतीय आंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने केली आहे. तसेच, यासंदर्भातील व्हिडिओही इस्रोने शेअर केला आहे.
आगामी १४ दिवस चांद्रयान-३ साठी खूप महत्वाचे असणार आहेत. २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंगनंतर, आता प्रज्ञान रोव्हरवर सगळ्यांची नजर आहे. परिस्थिती सामान्य झाल्यामुळए प्रज्ञान रोव्हर हे विक्रम लँडरमधून बाहेर आले आहे. ते आता चंद्राच्या पृष्ठभागावर चालत आहे.
१४ दिवसांची मोहिम
रोव्हर आणि लँडरकडून इस्रोला मिळणारी माहिती केवळ १४ दिवसांसाठीच असेल, कारण या काळातच चंद्राला पूर्ण प्रकाश मिळेल. या दिवसांमध्ये लँडर आणि रोव्हर सक्रियपणे इस्रोला माहिती पाठवतील. वास्तविक, १४ दिवसांनी चंद्रावर रात्र असेल. ही रात्र एका दिवसाची नसून संपूर्ण १४ दिवसांची असेल. इथे रात्री खूप थंडी असेल. विक्रम आणि प्रज्ञान फक्त सूर्यप्रकाशातच काम करू शकत असल्याने १४ दिवसांनी ते निष्क्रिय होतील. मात्र सूर्य पुन्हा १४ दिवसांनी उगवल्यावर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा चंद्रावर काम करण्याची शक्यता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नाकारलेली नाही. जर दोघेही १४ दिवसांनंतर योग्यरित्या कार्य करत असतील तर ते भारताच्या चंद्र मोहिमेसाठी बोनस असेल.
बघा, रोव्हर बाहेर येत असतानाचा व्हिडिओ
नंतर चंद्रावरच राहणार
चांद्रयान-३ पृथ्वीवर परत येईल असे नाही. विक्रम आणि प्रज्ञान काम करणार नाहीत, पण ते चंद्रावरच राहतील. भारताच्या चांद्रयान३ चे एकूण वजन ३९०० किलो आहे. प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन २१४८ किलो आहे आणि लँडर मॉड्यूलचे वजन १७५२ किलो आहे, त्यात २६ किलो रोव्हरचा समावेश आहे. इस्रोने चांद्रयान-३ च्या लँडिंग साइटचे छायाचित्र यापूर्वीच शेअर केले आहे. बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता झालेल्या अचूक सॉफ्ट लँडिंगनंतर विक्रमच्या कॅमेऱ्याने हे छायाचित्र काढले. चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तुलनेने सपाट भागात उतरले.
याची तपासणी करणार
प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक रचना, माती आणि खडकांची तपासणी करेल. हे ध्रुवीय प्रदेशाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावरील लोह आणि इलेक्ट्रॉन्सची घनता आणि थर्मल गुणधर्म मोजेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागाला यापूर्वी कोणीही भेट दिली नाही. कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचे धाडस करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काही महत्त्वाचे टप्पे असे
आता सर्वांची नजर प्रज्ञान रोव्हरवर आहे. परिस्थिती सामान्य झाल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आहे. चांद्रयान३ चे लँडर मॉड्यूल लँडरचे संपूर्ण कॉन्फिगरेशन दर्शविते. यामध्ये रोव्हरचे वजन २६ किलो आहे. हा रोव्हर चांद्रयान-२ च्या विक्रम रोव्हरसारखाच आहे. प्रज्ञान रोव्हर बाहेर यावून चंद्रावर चालायला लागला आहे. लँडरसोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर आपल्या चाकांच्या उपकरणासह उतरणारा रोव्हर तेथील पृष्ठभागाची संपूर्ण माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांना देण्यास सुरुवात करेल. या चाकांवर अशोकस्तंभाचे प्रतीक आणि इस्रोची चिन्हे कोरलेली आहेत, जे प्रज्ञान प्रगती करत असताना चंद्राच्या पृष्ठभागावर त्यांची छाप सोडतील. यासह चंद्रावर इस्रो आणि अशोक स्तंभाची चिन्हे असतील.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सॉफ्ट लँडिंगनंतर रोव्हर आणि लँडरकडून इस्रोला मिळणारी माहिती केवळ १४ दिवसांसाठी असेल, कारण या काळातच चंद्राला पूर्ण प्रकाश मिळेल. ते म्हणतात की रोव्हरकडून मिळालेली माहिती खूप महत्त्वाची मानली जाते कारण ते चंद्राच्या पृष्ठभागावर पुढे जात असते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, १४ दिवसांच्या आत रोव्हर चंद्रावरील आपला निश्चित मार्गच पूर्ण करणार नाही तर त्याची संपूर्ण माहिती इस्रोच्या डेटा सेंटरला पाठवत राहील. संजीव सहजपाल म्हणतात की माहिती आणि संपूर्ण तांत्रिक माहिती केवळ रोव्हरद्वारेच नाही तर लँडरद्वारे देखील मिळत राहील. लँडर आणि रोव्हर आम्हाला १४ दिवसांच्या संपूर्ण क्रियाकलापांसह माहिती पाठवतील. लँडर आणि रोव्हरची पॉवर बॅकअप क्षमता सर्व प्रतिकूल परिस्थितीत १४ दिवसांसाठी सर्वात जास्त आहे. त्यानंतर सूचना मिळणे बंद होईल किंवा त्यांचा वेग नगण्य असेल. मात्र, १४ दिवसांत मिळणारी माहिती ही अवकाशातील चंद्रावर होणाऱ्या सर्व शक्यतांची सर्वात महत्त्वाची माहिती असेल, असे अवकाश शास्त्रज्ञांचे मत आहे.
ISRO Chandrayaan3 Next 14 Days Planning Moon Lunar Mission
Space Vikram Rover
ISRO Chandrayaan3 Rover Ramp Down on Moon Lunar Mission
… … and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface.