इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चांद्रयान३ हे चंद्रावर गेल्यापासून तेथील घटना आणि घडामोडींची मोठीच उत्सुकता भारतवासियांसह खगोलप्रेमींना लागून आहे. आणि यासंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ISRO) ही सातत्याने नवनवीन अपडेटस देत आहे. आता एक गंमतीशीर व्हिडिओ इस्रोने जारी केला आहे. सुरक्षित मार्गाच्या शोधात रोव्हरने कशी गिरकी घेतली, ही रोटेशन प्रक्रिया लँडर इमेजर कॅमेऱ्याने टिपली. आणि त्याचाच व्हिडिओ इस्रोने सादर केला आहे.
रोव्हरने जणू स्वतःभोवती घेतलेल्या या प्रदक्षिणेचा हा व्हिडिओ इस्रोने शेअर केला आहे. शिवाय चंदामामाच्या अंगणात एखादं मुल थिरकतंय आणि आई आपुलकीनं पाहत आहे, असं वाटतं. असंही लिहिलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची चंद्रावरची तिसरी महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल (LM) आज चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) सह एलएलएम बुधवारी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या मोहिमेच्या यशामुळे चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करणारा भारत अमेरिका, चीन आणि माजी सोव्हिएत युनियन (रशिया) नंतरचा चौथा देश बनला आहे.
Chandrayaan-3 Mission:
The rover was rotated in search of a safe route. The rotation was captured by a Lander Imager Camera.
It feels as though a child is playfully frolicking in the yards of Chandamama, while the mother watches affectionately.
Isn’t it?
ISRO Chandrayaan3 Pradyan Rover Rotation on Lunar Surface Video