नवी दिल्ली – बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांचा आकर्षण केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगातील अन्य देशातील नागरिकांनाही आहे, याचा प्रत्यय नुकताच इस्राईलमध्ये आला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. येथे इस्राईल बरोबर ‘ मेड इन इंडिया ‘ अंतर्गत द्विपक्षीय करार करण्यासाठी आला आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, एस. जयशंकर यांना स्थानिक दृष्टीबाधित मुलीने गायलेले बॉलिवूड चित्रपटातील गाणे ऐकून आश्चर्य वाटले.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर दि. 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान इस्रायलच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री येयर लेपिड यांच्या आमंत्रणावरून जयशंकर आले आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणून जयशंकर यांचा हा पहिला इस्रायल दौरा असून या दरम्यान ते लेपिड यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेत आहेत. एस. जयशंकर आणि त्यांच्यासोबत आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे इस्रायलमध्ये विशेष स्वागत करण्यात आले.
शाल्वा नॅशनल सेंटरमधील एका दृष्टिहीन भारतीय वंशाच्या ज्यू मुलीने भारतीय आणि इस्रायली परराष्ट्र मंत्र्यांसमोर एक गाणे गायले आहे. शाल्वा नॅशनल सेंटर ही एक नामांकित स्वयंसेवी संस्था आहे जी इस्त्रायलमधील अपंग व्यक्तींना सक्षम बनवते. या दृष्टिहीन मुलीने जयशंकरसमोर दोन बॉलिवूड ‘ हर घडी बदल रही है.. ‘ तसेच ‘और तुम पास आये यूं मुस्कुराए.. ‘ ही दोन गाणी गायली. या दरम्यान, एस. जयशंकर आश्चर्यचकित झाले . तर त्यांची संपूर्ण टीम त्या मुलीचे गाणे लक्षपूर्वक ऐकत होती. या दरम्यान उपस्थित असलेल्या अधिकारी व नागरिकांनी टाळ्या वाजवून मुलीच्या गाण्याचे कौतुक केले.
या दौऱ्यात एस. जयशंकर तेथे राष्ट्राध्यक्ष इसहाक हर्जोग, पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि नेसेट संसदेचे अध्यक्ष यांची भेट घेतील. जुलै 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान भारत आणि इस्राईलने त्यांच्या द्विपक्षीय संबंधांचे धोरणात्मक मैत्रित रूपांतर केले आहे. तेव्हापासून दोन्ही देशांनी ज्ञान-आधारित संबंध वाढविण्यावर तसेच नाविन्य आणि संशोधन यावर भर दिला आहे, त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला गती मिळाली आहे.