विशेष प्रतिनिधी, मुंबई
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध जन्य परिस्थिती सध्या निवळली असली तरी या दोन्ही देशातील वाद जगभरातच चर्चेचा विषय बनला आहे. इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील हा संघर्ष आजचा नसून तब्बल १२० वर्षे जुना आहे. यहुदी आणि अरब देशातील लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याच्या मुद्यावरून हा संघर्ष सुरू झाला. १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने इस्राईलच्या अस्तित्वाला मान्यता देताच या क्षेत्रात हिंसा वाढली आहे आणि आजपर्यंत तणावाचे वातावरण कायम आहे.
दोघांमध्ये काय आहे वाद…
एकोणविसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवालीता खाडीच्या क्षेत्रात अनेक आंदोलने झाली. कारण एकच होते अरब आणि यहुदींसाठी स्वतंत्र राष्ट्राची स्थापना. १९२० च्या दशकात फलस्तिनी राष्ट्रवाद बघायला मळाला. यरुशलम मध्ये लाखोंच्या संख्येने अरब नागरिकांनी यहुदींच्या अगमनाला विरोध केला. १९४७ ला संयुक्त राष्ट्र संघाने पॅलेस्टाईनला दोन भागांमध्ये विभागले. यहुदींसाठी इस्राईल आणि अरब जगतातील लोकांसाठी पॅलेस्टाईन. त्यावर अरब जगतच्या लोकांनी आक्षेप नोंदवला व तेथून वाद सुरू झाला.
दोन्ही देशांची भूमिका
इस्राईल पूर्ण यरुशलमला आपली अविभाजित राजधानी मानतो. तर पॅलेस्टाईन यरुशलमच्या पूर्वेकडील भागाला आपली भावी राजधानी म्हणून बघत आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी मात्र यरुशलमचा ताबा घेण्यासाठी इस्राईलला परवानगी नाकारलेली आहे.