नाशिक – केंद्रीय विद्यालय आयएसपीची माजी विद्यार्थींनी अदिती चौबे सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तीच्या या यशाबद्दल प्राचार्य बाळासाहेब लोंढे, ग्रंथालयाचे प्रमुख शंकर सोनुले व आयएसपी कर्मचा-यांकडून पुष्प गुच्छ देवून तिचा सत्कार करण्यात आला. सीए सारख्या अवघड परीक्षेत हे यश मिळाल्यामुळे सर्वांनी आदितीचे कौतुक करत तीला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी आदितीने कठोर परिश्रम घेऊन हे य़श मिळवल्याचे यावेळी तीच्या पालकांनी सांगितले.