सोमवार, सप्टेंबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतविरोधी मोठ्या घातपाताचा पर्दाफाश; लोकेशन ट्रेस केल्याने सापडले दहशतवादी

१० दहशतवाद्यांना अटक

by Gautam Sancheti
ऑगस्ट 7, 2021 | 5:23 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – उत्तर प्रदेश एटीएसने अलकायदाचे दहशतवादी मॉडेल उघड करून संबंधित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांनी इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवादी मॉडेलचा पर्दाफाश केला आहे. गेल्या महिनाभरात जम्मू-काश्मीर, कर्नाटक आणि केरळमध्ये २१ ठिकाणी छापे मारून एकूण १० दहशतवाद्यांना अटक केली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. जवळपास एका वर्षापूर्वी भारतातील सक्रिय आयएस मॉडेलबाबत माहिती मिळाली होती.

असे ट्रेस झाले लोकेशन
सुरक्षा यंत्रणांशी संबंधित एक वरिष्ठ अधिकारी सांगतात, दहशतवादी क्रॉनिकल फाउंडेशनच्या नावाने इन्स्टाग्राम चॅनेलवर मोठ्या प्रमाणात आयएसच्या दुष्प्रचाराचा कंटेंट टाकत होते. या चॅनलचे जगभरात पाच हजार सक्रिय सदस्य आहेत. छद्म नावाच्या सक्रिय सदस्यांची सुरक्षा यंत्रणांनी पडताळणी सुरू केली. कर्नाटकच्या मंगळुरू आणि बेंगळुरूसह जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपुरामध्ये दहशतवाद्यांच्या जागांचा ठावठिकाणा लागला.

एनआयएकडून तपास
हळूहळू या दहशतवाद्यांची ओळख पटविण्यात आली आहे. या वर्षी मार्चमध्ये एनआयएने गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. यातील काही दहशतवाद्यांनी आयएसच्या ताब्यातील सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानला जाण्याची तयारी सुरू केली होती. काही दहशतवाद्यांनी २०१९ च्या एप्रिलमध्ये इराण मार्गे अफगाणिस्तानला जाण्याचाही प्रयत्न केला आहे.

हल्ला करण्याची तयारी
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित दहशतवादी काश्मीरमध्ये आयएस दहशतवाद्यांचे जाळे तयार करण्यासह हल्ल्यांना मूर्त रूप देण्याच्या तयारीत होते. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणार्यांना ते पैसेही देत होते. अटक करण्यात आलेला दहशतवादी डॉ. रहिसकडून जप्त डिजिटल डिव्हाइसमध्ये स्फोटके बनविण्याच्या तंत्राची सविस्तर माहिती होती. हिंदुत्वावादी नेत्यांची हत्या करून देशात सांप्रदायिक तणाव निर्माण करून मीडिया हाउसेसवर हल्ला करण्याची योजना आखत होते.

छद्म नावाने ऑनलाइन नियतकालिक
आयएसच्या एका मॉडेलचा सूत्रधार जुफरी जौहर दामुदी आणि त्याचा साथीदार अमीन जुहेबला शुक्रवारी कर्नाटकमधील भटकळ येथून अटक केली. गेल्या वर्षी एप्रिलपासून जुफरी वायस ऑफ हिंद नावाने एक ऑनलाइन नियतकालिक काढत होता. त्यामध्ये आयएसच्या दुष्प्रचारासह भारतीय युवकांसाठी प्रक्षोभक मजकूरही होता.

जुफरीची ओळख अशी पटली
सुरक्षा यंत्रणांपासून लपण्यासाठी जुफरीने अबू हाजीर अल बदरी असे आपले नामकरण केले होते. स्वतःला अफगाणिस्तानातील रहिवासी असल्याचे सांगत होता. परंतु तपासाअंती तो भारतातच सक्रिय असल्याचे सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली. ११ जुलैला अटक करण्यात आलेल्या कासीम खुरासानी ऊर्फ निसार याच्या चौकशीच्या आधारावरून जुफरीची ओळख पटली. जुफरीचा लहान भाऊ अदनान हसन दामुदीला २०१७ मध्ये आयएनएने आयएसशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती.

परदेशी संस्थांकडून मिळाली मदत
या मॉडेलच्या सदस्यांची ओळख पटविण्यासह अटक करण्यासाठी परदेशी संस्थांची मदत घेण्यात आली. त्याशिवाय एनआयए, गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी परस्पर सहकार्य केले. तसेच छोट्या-मोठ्या माहितीचे रिअल टाइमचे आदानप्रदान आणि त्याच्या विश्लेषण करण्यात आले. गेल्या एका महिन्यात आयएसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी अनंतनाग, श्रीनगर, बांदीपुरा, मंगळुरू, बंगळुरू आणि भटकळमध्ये एकूण २१ ठिकाणी छापे मारण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत प्रथमच सात बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Next Post

नांदगाव -कोरोनामुळे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजाराची मदत, दहावी पर्यंतचे शिक्षणही मोफत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतेही कार्य करताना दक्षता बाळगावी, जाणून घ्या, मंगळवार, २३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 22, 2025
पॉड टॅक्सीबाबत आयोजित बैठक 2 1024x548 1
महत्त्वाच्या बातम्या

आता ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा…परिवहन सेवेचे पुढचे पाऊल

सप्टेंबर 22, 2025
IMG 20250922 WA0409
महत्त्वाच्या बातम्या

आता आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास मिळणार इतक्या कोटींचा पुरस्कार

सप्टेंबर 22, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 22, 2025
IMG 20250922 WA0388 1
महत्त्वाच्या बातम्या

नवरात्र उत्सवानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कोटमगाव जगदंबा मातेचे दर्शन….

सप्टेंबर 22, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या तारखेदरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता…

सप्टेंबर 22, 2025
crime1
क्राईम डायरी

इमारतीतून चोरट्यांनी लिफ्टच्या बॅट-या चोरल्या…ओमकारनगर येथील घटना

सप्टेंबर 22, 2025
cm untold story4 1024x682 1
संमिश्र वार्ता

‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन…

सप्टेंबर 22, 2025
Next Post
IMG 20210807 WA0177 e1628337593796

नांदगाव -कोरोनामुळे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजाराची मदत, दहावी पर्यंतचे शिक्षणही मोफत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011