इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ. भारतात तर क्रिकेटला एक वेगळे स्थान आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेटप्रेमी हा खेळ जितका आवडीने खेळतात तितकाच तो पाहताना त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील देत असतात.
सध्या भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला गेला. इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करत केवळ १२६ चेंडूत द्विशतक झळकावले. आपला उत्कृष्ट खेळ दाखवत इशान किशनने १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २४ चौकार आणि १० षटकारांचा समावेश आहे. बांग्लादेशच्या प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूवर ईशानची बॅट चांगलीच तळपत होती. त्यामुळे बांगलादेशचे गोलंदाज अखेर नमले तर ईशानच्या द्विशतकावर त्याची गर्लफ्रेंड आदिती भावूक झाल्याचे त्याच्या पोस्टवरून पाहायला मिळत आहे.
सुरवातीला बांगलादेश संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताकडून ईशान किशन आणि शिखर धवन प्रथम फलंदाजीला आला. या सलामी जोडीमधील ईशानने सुरुवातीपासूनच फटकेबाजीला सुरुवात केली. तिसर्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने ८५ चेंडूत शानदार शतक झळकावले. एकदिवसीय कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक आहे. त्याने १५ चौकार आणि २ षटकार लगावत सर्वांनाच आपला फॉर्म दाखवून दिला. २४ व्या षटकात ईशानने आपले पाहिलं शतक झळकावले. तर २८ व्या षटकात त्याने १५० धावा पूर्ण केल्या. ३५ व्या षटकामध्ये त्याने आपले द्विशतक झळकावले आहे. यामध्ये त्याने २३ चौकार आणि ९ षटकार लगावले. त्याच्या या खेळीने सर्वांनाच चकित केले आहे. ईशान किशन हा बांगलादेशविरुद्ध मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा इशान किशन हा चौथ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. इशान किशनच्या आधी रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनीही वनडे सामन्यात द्विशतक झळकावले आहे.
ईशान किशनने वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावल्याच्या आनंदात त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया प्रचंड खुश झाली आहे. तिने आपल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. अदितीने इशान किशनचा एक फोटो शेअर करताना त्यावर हार्ट आणि इमोशनल झाल्याचे इमोजी लावले आहे. यानंतर, अदिती हुडियाने इशान किशनचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. अदितीने BCCI च्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला इशान -किशनचा आणखी एक फोटोही शेअर केला आहे. यात तो टीम इंडियाच्या जर्सित द्विशतक झळकावल्यानंतर बॅट उंचावताना दिसत आहे. इशान किशनची गर्लफ्रेड अदिती हुंडिया एक मॉडेल आहे.
इशानच्या द्विशतकानिमित्त कोहलीने केलेला जल्लोष हा अनोखा होता. तिसऱ्या वनडे सामन्यात इशानने १३१ चेंडूंचा सामना करत २१० धवांची जबरदस्त खेळी केली. आपल्या खेळीत त्याने २४ चौकार आणि १० षटकारही लगावले. इशानने आपल्या सुरुवातीच्या १०० धावा ८५ चेंडूत फटकावल्या. तर पुढच्या १०० धावा त्याने केवळ ४१ चेंडूतच केल्या. इशानने विश्वविक्रमही केला आहे. आता तो जगातील सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे.
Ishan Kishan Girl Friend Reaction After Double Centaury