विशेष प्रतिनिधी, पुणे
भारतात कोरोनापाठोपाठ काळी बुरशी सुद्धा (म्युकरमायकोसिस) नियंत्रणाबाहेर जात आहे. कुणी रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हा आजार होत असल्याचे म्हणतोय, तर कुणी स्टेरॉईडला दोष देत आहे. तर डॉक्टरांचे म्हणणे आहे की संपूर्ण जगात यावर उपचार म्हणून स्टेरॉईडचा वापर झालेला आहे. मात्र भारतात ज्याप्रकारे काळी बुरशी पसरतोय, तसे कुठल्याच देशात अद्याप बघायला मिळालेले नाही.
हे तर कारण नाही?
लखनऊच्या केजीएमयू येथील पल्मोनरी क्रिटिकल केयर विभागाचे प्रमुख डॉ. वेद प्रकाश यांनी सांगितले की, स्वस्थ आणि निरोगी व्यक्ती प्रति मिनीट ६ ते १० लीटर ऑक्सिजन घेते. कोरोना रुग्णांना हाय फ्लो नेझल केनुला (एचएफएनसी) च्या माध्यमातून प्रति मिनीट ६० लीटर ऑक्सिजन दिले जात आहे. त्यामुळे नाकाच्या पॅरानेझल सायनस आणि म्यूकोसा कोरड्या होत आहेत. त्याठिकाणी जखमही होत आहे आणि त्याच जागेवर फंगस होत असल्याने कोरोना महामारीत आणखी एक नवी समस्या उभी झाली आहे.
स्टेरॉईडमुळे होत असेल का?
डॉ. वेद सांगतात की, कोरोना रुग्णांना स्टेरॉईडचे टॅपरिंग डोस न दिल्याने फंगस हावी होऊ शकतो. खरे तर स्टेरॉईड पाच ते दहा दिवसांसाठी हाय डोस ते लो डोसच्या स्वरुपात द्यायला हवे. होम आयसोलेशनच्या रुग्णांना लो डोस दिले जात आहेत आणि त्यांची प्रकृती बिघडली की रुग्णालयात हाय डोस दिला जात आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे आणि बुरशी हल्ला करीत आहे.
रक्त पुरवठ्यात अडथळा
मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. संजीव बधवार सांगतात की, काळ्या बुरशीचे रुग्ण जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात फार जास्त आहेत. मात्र आहेत साऱ्याच देशांमध्ये. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पोस्टमार्मननंतर निदर्शनास आले आहे की, संक्रमण झाल्यानंतर रक्तपुरवठा प्रभावित होतो. त्यामुळे शरीरातील टिशूज खराब होऊन त्याजागेवर काळसरपणा येतो. मृतदेहांमध्ये बुरशी आढळून आलेली आहे. कोरोना संक्रमणात ब्लड क्लॉटमुळे शरीराच्या टिशूज खरात होतात आणि त्यावर बुरशी हल्ला चढवतात. त्यामुळेच कदाचित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असावी.
आता औषधाच्या रुपात झिंक
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णांना चार ते पाच दिवस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी झिंकच्या गोळ्या दिल्या जात आहे. मात्र ही झिंकची गोळी काळ्या बुरशीला शरीरात वाढण्यासाठी मदत करत असेल, अशी शक्यता आहे. झिंक केवळ काळी बुरशी नाही तर दुसऱ्या प्रकारचे पॅरासाईट्स वाढण्याचे कारणही ठरू शकते.
हे लक्षात घ्या
-
९९.५ टक्के असते मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची शुद्धता
-
०.५ टक्के शुद्धताही कमी असेल तर जीवाला धोका संभवतो
-
१०० पैकी १५ रुग्णांना मधुमेह असल्याचे माहितीच नसते
-
निरोगी आणि स्वस्थ व्यक्ती प्रति मिनीट ६ ते १० लीटर ऑक्सिजन घेते
-
कोरोना रुग्णांना ६० लीटर प्रती मिनीट ऑक्सिजन दिले जात आहे