इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय रेल्वेने उत्तर भारतातील तीर्थस्थळांसाठी खास टूर पॅकेज तयार करण्यात आले आहे. त्यासाठी IRCTCने रामपथ दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना उत्तर भारताचे दर्शन दिले जाणार आहे. हे टूर पॅकेज 8 दिवस आणि 9 रात्रीचे आहे. अयोध्या, हरिद्वार, वाराणसी आणि मथुरा आदी उत्तर भारतातील प्रमुख ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहेत.
पर्यटनाला चालना देण्यासाठी रामपथ स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम वाराणसी असेल, जिथे काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरिडॉरला भेट दिली जाईल. वाराणसीमध्ये रात्रीचा मुक्काम केल्यानंतर ही ट्रेन दुसऱ्या दिवशी अयोध्येला रवाना होईल. येथे प्रवासी रामजन्मभूमी आणि इतर मंदिरांना भेट देऊ शकतात. यानंतर ही ट्रेन दुपारी हरिद्वारला जाईल. येथे संध्या आरतीसह इतर मंदिरांना भेट देता येईल.
यानंतर ही ट्रेन ऋषिकेशला जाईल, जिथे राम आणि लक्ष्मण झुला दिसतील. दुसऱ्या दिवशी प्रवासी प्रमुख मंदिरांना भेट देण्यासाठी मथुरेला जातील आणि नंतर वृंदावनला जातील. येथे रात्रभर मुक्काम केल्यानंतर, सकाळी नाश्ता केल्यानंतर, इस्कॉन मंदिर आणि इतर मंदिरांना भेट दिली जाईल. यानंतर ट्रेन प्रयागराजकडे रवाना होईल. दुसऱ्या दिवशी प्रयागराजमध्ये संगमावर स्नान करून हनुमान मंदिराला भेट देऊ शकता.
स्लीपर क्लाससाठी, प्रवाशांना प्रति व्यक्ती 8505 रुपये मोजावे लागतील, तर AC वर्थ 3 साठी, प्रति व्यक्ती 14,175 रुपये भाडे असेल.
यात्रेदरम्यान भाविकांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे तीन वेळा शुद्ध शाकाहारी भोजन दिले जाईल. त्याचबरोबर स्वच्छ हॉटेल्समध्ये राहण्याची आणि आरोग्याची सोय करण्यात येणार आहे. बुकिंग किंवा अधिक माहितीसाठी IRCTC वेबसाइट irctctourism.com किंवा 8638507592 वर संपर्क साधू शकता.