मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशात दिवसागणिक वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वाढत्या वानसंख्येबरोबर अपघात देखील होत असल्याने वाहन चालकांसाठी वाहनांचा इन्शुरन्स करणे आवश्यक ठरते. आता देशभरातील कोट्यावधी वाहन चालकांसाठी एक चांगली माहिती समोर आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेत ही माहिती समोर आली आहे.
इन्शुरन्स रेग्युलरिटी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीए) इन्शूरन्सच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना गाडीच्या इन्शूरन्समध्ये सूट मिळू शकेल. आयआरडीएआयद्वारे कार इन्शूरन्समध्ये करण्यात आलेले बदल लागू झाल्यावर, तुम्ही गाडी कशी चालवता, नियमांचे किती पालन करता या बाबींवर थोडक्यात तुमचे ड्रायव्हिंग कौशल्य पाहून तुमच्या कार इन्शूरन्सचा प्रीमिअम ठरवण्यात येईल. तसेच तुमच्या घरात एकापेक्षा जास्त वाहने असतील तरी ती सर्व एकाच इन्शूरन्समध्ये कव्हर होतील.
मोटरसायकल असो वा कार, प्रत्येक वाहनासाठी आता वेगळ्या इन्शूरन्सची गरज लागणार नाही. कार इन्श्युरन्स हा एक करार आहे जो आपण आणि आपला इन्शुरर अपघात, चोरी आणि अगदी नैसर्गिक आपत्तीसारख्या अप्रत्याशित परिस्थितीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून आपले संरक्षण करण्यासाठी केला जातो. भारत सरकारने सर्व कार मालकांना थर्ड-पार्टी कार इन्श्युरन्स पॉलिसी काढणे अनिवार्य केले आहे.
या पॉलिसी मध्ये आपल्याकडून इतरांच्या जीवाला किंवा मालमत्तेला, आपल्या कारच्या दुर्दैवी अपघातामुळे झालेल्या नुकसानीला कव्हर केले जाते. इन्श्युरन्सचा दुसरा सामान्य प्रकार म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स. हे आपली कार सामाजिक अशांतता, नैसर्गिक आपत्तीत किंवा चोरीच्या प्रकरणात चोरीस गेली तर आपणास आकर्षित करू शकणाऱ्या बहुतेक लायबलीटीला कव्हर करण्यास मदत करते.
दरम्यान, IRDAIच्या नव्या नियमांनुसार, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्यानुसार (स्किल) तुमच्या कारचा इन्शूरन्स प्रीमिअम ठरेल. तुम्ही गाडी कशी चालवता, सर्व नियमांचे पालन करता का, रस्त्यावरील इतर वाहनांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षितपणे गाडी चालवता का ? या सर्व बाबींची नोंद ठेवण्यात येणार आहे. तुमचे ड्रायव्हिंग या सर्व निकषांत बसत असेल तर कारच्या इन्शूरन्सचा प्रीमिअम कमी भरावा लागेल. मात्र रॅश ड्रायव्हिंग करत असाल, वाहन नीट चालवत नसाल तर तुम्हाला जास्त प्रीमिअम भरावा लागेल. त्यामुळे सेफ ड्रायव्हिंग केल्यामुळे तुम्ही सुरक्षित रहालच. पण तुमच्या खिशावरही फार भार पडणार नाही.
तसेच आयआरडीएआयने लागू केलेल्या नियमांनुसार, ड्रायव्हिंग कौशल्यासह एका वर्षात तुम्ही किती किलोमीटर गाडी चालवली याचा प्रभावही इन्शूरन्स पॉलिसीवर पडू शकेल. तुम्ही जितकी गाडी चालवाल, इन्शूरन्सचा प्रीमिअमही त्या प्रमाणात भरावा लागेल. कार इन्शूरन्सच्या नियमाती नवे बदल तत्काळ लागू होणार आहेत. इन्शूरन्स कंपन्यांनीही त्यासंबंधित योग्य पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
IRDAI Vehicle Insurance New Rule Relief for Owners Automobile