मुंबई – रेल्वे विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयआरसीटीसीने रामभक्त, भाविक आणि पर्यटकांसाठी भगवान श्रीराम यांच्याशी संबंधित ठिकाणांच्या सहल तथा यात्रेसाठी एक विशेष पॅकेज आणले आहे. याकरिता आयआरसीटीसीने ‘ देखो अपना देश डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेन ‘ द्वारे तिर्थक्षेत्र यात्रा आयोजित केली आहे. “श्री रामायण यात्रा” ही तीर्थयात्रा रामायण सर्किटमध्ये असलेल्या भगवान श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख पवित्र स्थळांचा समावेश केला आहे.
१) श्री रामायण यात्रेअंतर्गत प्रवाशांना १६ रात्री आणि १७ दिवसांचे टूर पॅकेज दिले जात आहे. आयआरसीटीसीच्या या विशेष दौऱ्यासाठी केवळ ८२,९५० रुपये दयावे लागतील. या यात्रेचा प्रवास दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकापासून सुरू होईल. ही रेल्वे गाडी सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ६ वाजता सुटेल.
२) दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन अयोध्येला पोहोचेल. अयोध्येनंतर दुसऱ्या दिवशी ही ट्रेन अयोध्यापासून २० किमी अंतरावर नंदीग्रामकडे रवाना होईल. तसेच अयोध्या नंदीग्रामनंतर ही ट्रेन सीतामढी, जनकपूरकडे रवाना होईल.
३) यानंतर ट्रेन सहाव्या दिवशी वाराणसीला पोहोचेल. वाराणसीनंतर ही ट्रेन प्रवाशांना दुसऱ्या दिवशी प्रयागराजला घेऊन जाईल. प्रयाग राज येथून ट्रेन चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वरम मार्गे सफदरजंग रेल्वे स्थानकावर परत येईल.
४) या टूर पॅकेजअंतर्गत प्रवाशांना प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीच्या एसी कोचमध्ये विशेष ट्रेनमध्ये प्रवास करता येईल. या व्यतिरिक्त, प्रवाशांना ८ रात्रीच्या विश्रांतीसाठी डिलक्स श्रेणीतील निवासस्थानात बसवले जाईल.
५) प्रवासाच्या दरम्यान प्रवाशांना जेवणही दिले जाईल. मात्र, या काळात फक्त शाकाहारी अन्न दिले जाईल. तसेच हॉटेल्समध्ये जेवणाचीही व्यवस्था केली जाईल. या यात्रेकरता प्रवास, जेवण आणि इतर खर्च मिळून सुमारे ८३ हजार रुपये भाडे आकारले जाईल.
६) यासोबतच एसी वाहनांचीही दर्शनासाठी व्यवस्था केली जाईल. प्रवाशांचा प्रवास विमा देखील केला जाईल. याशिवाय, प्रवाशांना मदत करण्यासाठी ट्रेनमध्ये एक टूर मॅनेजर देखील असेल.