इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्ही जर उन्हाळी सुटीत उत्तराखंडमधील हरिद्वार, मसुरी, ऋषिकेश ला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक भारी टूर पॅकजची माहिती देणार आहोत. IRCTCचे हे टूर पॅकेज असून याद्वारे तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता. राहणे, फिरणे, जेवण अशा सर्वच बाबी या पॅकेजमध्ये आहेत. चला, तर वेळ न दवडता आपण याविषयी जाणून घेऊया…
IRCTC अनेकदा फिरण्यासाठी उत्तम आणि स्वस्त टूर पॅकेजेस घेऊन येते. IRCTC टूर पॅकेज कमी दिवसात अनेक ठिकाणे कव्हर करतात. यादरम्यान दळणवळणाच्या साधनांसह स्थानिक वाहतूक, राहण्यासाठी खोल्या आणि खाण्यापिण्याची सोय केली जाते. बजेटमध्ये प्रवाशांना ही संपूर्ण सुविधा देण्यासोबतच आयआरसीटीसी सुरक्षाही पुरवते. त्यामुळे या टूरला अनेक जण प्राधान्य देतात.
IRCTC ने उत्तराखंडला भेट देण्यासाठी खास टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना हरिद्वार, ऋषिकेश, डेहराडून आणि मसुरीला जाता येणार आहे. उत्तराखंडमधील या सुंदर आणि लोकप्रिय ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रवासी IRCTC टूर पॅकेज बुक करू शकतात. आयआरसीटीसी टूर पॅकेजची किंमत, प्रवासाची तारीख, भेट देण्याची पर्यटन ठिकाणे आणि टूर पॅकेजची सुविधा याबद्दल आपण आता जाणून घेऊया…
रेल्वेच्या या टूर पॅकेजचे नाव हेवनली उत्तराखंड आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला उत्तराखंडमधील प्रसिद्ध ठिकाणी नेले जाईल. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना विमानाने प्रवास करण्याचीही संधी मिळणार आहे. या टूरमध्ये अनेक सुंदर ठिकाणांना भेटी दिल्या जातील.
IRCTC टूर पॅकेज ५ रात्री आणि ६ दिवसांचे आहे. हे टूर पॅकेज २३ मार्चपासून सुरू झाले आहे. जून २०२३ पर्यंत तुम्ही या टूर पॅकेजचा आनंद घेऊ शकता.
टूर पॅकेज अंतर्गत, पहिल्या दिवशी, तुम्ही हरिद्वारच्या रोपवेद्वारे मनसा देवी मंदिर, चंडी देवी मंदिराला भेट देऊ शकता. दुसऱ्या दिवशी ऋषिकेशमध्ये तुम्ही राम झुला, लक्ष्मण झुला, स्वर्ग आश्रम आणि त्रिवेणी घाट येथे गंगा आरती पाहू शकाल. हरिद्वारमध्ये रात्रभर मुक्काम असेल. तिसऱ्या दिवशी डेहराडूनला निघायचे, जिथे तुम्हाला एफआरआय, टपकेश्वर मंदिर, डीअर पार्क, शिव मंदिर आणि पलटन बाजारला भेट देता येईल. चौथ्या दिवशी मसुरी येथील केम्पटी फॉल, गन हिल, देव भूमी वॅक्स म्युझियमला भेट दिल्यानंतर डेहराडूनहून दिल्लीकडे प्रयाण अशी ही टूर आहे.
या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सुविधा मिळणार आहे. उत्तराखंडला जाण्यासाठी बसची सुविधा दिली जाईल.
हे पाच दिवसांचे टूर पॅकेज बुक करण्यासाठी, एका प्रवाशाला ६३,४३५ रुपये भाडे द्यावे लागेल. दोन प्रवासी असल्यास प्रति व्यक्ती ३९,८९० रुपये शुल्क आकारले जाते. तीन व्यक्तींसाठी उत्तराखंड टूर पॅकेजचे भाडे ३४,१०० रुपये प्रति व्यक्ती आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजचे अधिक तपशील आणि तिकीट बुकींगसाठी
https://www.irctctourism.com/tourpacakage_search?searchKey=&tagType=&travelType=Domestic§or=All
या वेबसाइटला भेट द्यावी, असे IRCTCने सांगितले आहे.
IRCTC Heavenly Uttarakhand Tour Package Details