नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय मंत्रिमंडळाने वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची देशाची गुप्तचर संस्था RAW (संशोधन आणि विश्लेषण विंग) चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. रवी सिन्हा सामंत हे कुमार गोयल यांची जागा घेतील, ज्यांचा RAW प्रमुख म्हणून कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. रवी सिन्हा सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
रवी सिन्हा हे छत्तीसगड केडरचे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रवी सिन्हा यांच्या आधी सामंत गोयल यांचा रॉ चीफ म्हणून कार्यकाळ अनेक उपलब्धींनी भरलेला होता. सामंत गोयल हे रॉचे प्रमुख असतानाच पाकिस्तानमध्ये बालाकोट एअर स्ट्राइक करण्यात आला होता. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले.