एखादा पोलीस अधिकारी राजकीय पक्षाचा पट्टा बांधून राजकारण समाजकारणात किती ढवळाढवळ करू शकतो याचे उदाहरण म्हणजे रश्मी शुक्ला. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विरोधकांचे फोन टॅपिंग करण्यापासून ते आमदार फोडाफोडीपर्यंतची त्यांची सक्रियता होती. त्यांच्यावरील गुन्ह्याच्या निमित्ताने त्यांची कुंडली सरकारने बाहेर काढायला हवी. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे