मुंबई – माजी पोलिस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंग हे रशियात पळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, सक्तवसुली संचलनालयाकडून देशमुख यांची चौकशी सुरू आहे. त्याशिवाय राज्य सरकारनेही सिंग याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हे सारे सुरू असतानाच सिंग हे भारतातून पळून गेल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे की, परमबीर सिंग रशियाला पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय ते जाऊ शकत नाहीत. त्यांना परवानगी कुणी आणि कशी दिली हे तपासले जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने आम्ही त्यांना शोधून काढू, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1443572674165235714