मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमध्ये विराट कोहलीने गौतम गंभीरसोबत पंगा तर घेतला, पण त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या परफॉर्मन्सवर फारसा झालेला दिसत नाही. सुरुवातीला बरेच सामने पराभूत झाल्यानंतर गुरुवारच्या सामन्यात विराटने प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
गुरुवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली मैदानात उतरला तेव्हा पहिल्या बॉलपासूनच त्याने जलवा दाखवायला सुरुवात केली. विराट आणि डुप्लेसी शंभर धावांपर्यंत सारखेच खेळत होते. एकवेळ तर अशी होती की विराटच्या ३४ चेंडूंमध्ये ४८ धावा होत्या आणि डुप्लेसीच्या ३३ चेंडूंमध्ये ४८ धावा होत्या.
त्यानंतर विराट इतक्या झपाट्याने पुढे गेला की जणूकाही १५ षटकांमध्येच त्याला सामना संपवायचा होता. बंगळुरूला केवळ सामना जिंकणे महत्त्वाचे नव्हते, त्यांना नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार होता. त्यादृष्टीने कालचा सामना जिंकून बंगळुरूने १४ गुणांसह थेट चौथ्या क्रमांकावर मजल मारली आहे. आता त्यांनी अखेरचा सामना जिंकल्यास प्ले-ऑफमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित झालेले असे. बंगळुरूने गुरुवारचा सामना जिंकून मुंबईला मागे टाकत चौथे स्थान घेतले आहे.
https://twitter.com/IPL/status/1659213757057503233?s=20
आता बंगळुरू आणि मुंबई या दोन्ही संघांकडे प्रत्येकी १४ गुण आहेत. आणि दोघांनाही शेवटचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. बंगळुरूला शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पुढे जायचे आहे. तर मुंबईला हैदराबादचा सामना करायचा आहे. या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यास राजस्थान आणि पंजाबच्या आशा जीवंत असतील. याशिवाय मुंबई आणि बंगळुरूने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आणि चेन्नई आणि लखनौ आपल्या शेवटच्या सामन्यांमध्ये पराभूत झाले तर पॉईंट टेबलचे चित्रच वेगळे असणार आहे.
https://twitter.com/IPL/status/1659248212119781376?s=20
स्पर्धेत नाही, पण परिणाम होईल
दिल्ली, हैदराबाद प्ले-ऑफच्या स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर आहेत, पण त्यांच्याविरुद्धच्या सामन्यांच्या निकालावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हैदराबादने मुंबईला पराभूत केले आणि दिल्लीने चेन्नईला पराभूत केले तर बराच परिणाम होणार आहे. दुसरीकडे कोलकाताचा शेवटचा सामना २० मे रोजी होणार आहे. या सामन्यात ते लखनौविरुद्ध भिडतील. लखनौला पराभूत केल्यास कोलकाताचे किती भले होईल, हे सांगता येणार नाही. पण लखनौ पराभूत झाल्यास त्यांचे मोठे नुकसान होणार, हे निश्चित आहे.
https://twitter.com/IPL/status/1659238381249757198?s=20
IPL Play Off Bengluru Mumbai Tough Fight