मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – सध्या देशभरात आयपीएल बोलबाला सुरू आहे क्रिकेट सामने बघण्यासाठी रसिक नेहमीच उत्सुक असतात. आयपीएल 2022 चे लीग स्टेजचे सामने सध्या मुंबई आणि पुणे, येथे खेळले जात आहेत. आता लीग स्टेजनंतर प्लेऑफचे सामने खेळवले जातील आणि त्यानंतर फायनल. लीगच्या 15 व्या हंगामातील प्लेऑफ सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
एका अधिकृत वृत्तानुसार, क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामने कोलकात्यात तर क्वालिफायर-2 अहमदाबादमध्ये होणार आहेत. याबाबत बोर्ड लवकरच अधिकृत घोषणा करू शकते. येत्या काही दिवसांत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे आणि त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल. लखनौच्या नवीन स्टेडियममध्ये प्लेऑफ सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव असल्याचे अहवालात म्हटले आहे.
लखनौच्या एकना स्टेडियमवर पात्रता फेरीचे आयोजन करण्याची औपचारिक विनंती यूपी क्रिकेट असोसिएशनने BCCI आणि IPL गव्हर्निंग कौन्सिलला केली आहे. मात्र, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल हा प्रस्ताव मान्य करेल अशी शक्यता नाही.
सुमारे दोन वर्षे देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या क्रिकेटच सामने आणि क्रीडा स्पर्धा बंद होते. परंतु आता प्रत्यक्षात दोन वर्षांनी भारतात आयपीएलचे आयोजन होत आहे. 15 व्या हंगामातील लीग टप्प्यातील सामने सध्या मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळले जात आहेत. यावेळी प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला आहे.