मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा भारतीय क्रिकेटर आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज आहे. त्याने २० जानेवारी २०२१ मध्ये हरियाणा विरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून १५ जानेवारी २०२१ रोजी २०-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याचा एक किळसवाणा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
पदार्पणामध्ये त्याने तीन षटकांत 34 धावा देऊन एक बळी घेतला. त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे आणि अलीकडेच त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे, तो त्याच्या मूळ संघ मुंबई इंडियन्सकडून खेळत असून त्याचे वडीलही निवृत्तीपर्यंत त्याच संघाकडून खेळले. परंतु अर्जुन हा सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे, नेमकी काय घडलेली गोष्ट? काय तर म्हणे त्याने नाकात बोट घातले! अनेक लहान मुले ही कृती बऱ्याच वेळा करतात, परंतु त्यानंतर जर आणखी पुढे काही वेगळे केले तर लहान मुलांना फटका बसतो, अर्जुन तेंडुलकरने मात्र असे केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष वेगळेच घडले आहे.
त्याचे असे झाले की, आयपीएल २०२३ मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळला गेला. यात गतविजेत्या गुजरातने मुंबईचा ५५ धावांनी पराभव केला. या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू अर्जुन तेंडुलकर काहीसा किळसवाणा प्रकार करत असल्याचे दिसत आहे. भरमैदानात हजारो प्रेक्षकांसमोर तो असा वागू शकतो का ? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
एका व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत अर्जुन नाकात बोट घालताना दिसत आहे आणि मग तेच बोट तो तोंडात घालतो. पण मुळात त्याने आधी आपले नख चावले आणि नंतर बोट नाकात घातले. त्याचा हा प्रकार कॅमेरामनने आपल्या व्हिडिओत कैद केला.नंतर काहींनी अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर उलट करून शेअर केला आणि साहजिकच तो व्हायरल होऊ लागला. यानंतर काही फॅन पेजवर मूळ व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे याचा खरा खुलासा झाला आहे अर्थात मैदानावर अनेक जण नाकात किंवा तोंडात बोट घालतात त्यात वेगळे काही नाही.
Original Video pic.twitter.com/oY9LPrUtXj
— Chanakya (@ChanakyaSG) April 26, 2023
IPL Mumbai Indians Player Arjun Tendulkar Video Viral