इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गोष्टी ऑनलाईन मागवण्याची सध्या चांगलीच क्रेझ आहे. घरपोच मिळत असल्याने काहीही मागवले जाते. याचाच अनुभव आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान आला आहे. केवळ अंतिम सामन्याच्यादरम्यान २४२३ कंडोम, ३ लाख ६८ हजार जिलेबी, ३६४१ कप दही, १ कोटी २० लाख बिर्याणी एवढे सामान मागवण्यात आले आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. यामुळे हा सामना मध्यरात्रीपर्यंत चालला आणि निकालासाठी प्रेक्षकांना रात्री पावणे दोनपर्यंत वाट पाहावी लागली. सहाजिक आहे, वाट बघायची म्हणजे काही ना काही खाण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी लागतच. त्यामुळेच यावेळी घरी सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांनी स्विगीवरून कोणत्या गोष्टींची ऑर्डर केली ती यादी शेअर करण्यात आली आहे. ही यादी पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
कशाकशाची केली मागणी?
फूड डिलिव्हरी ऍप स्विगीने ट्विटरला सामन्यादम्यान आणि सामन्यानंतर लोक कोणत्या पदार्थ, गोष्टींची ऑर्डर देतात याचे अपडेट्स दिले. सोमवारीही सामना लांबल्याने प्रेक्षक रात्रभर स्विगीवर ऑर्डर देत होते. दही साखरेपासून ते बिर्याणी अशा खाण्याच्या गोष्टी रात्रभर लोक ऑर्डर करत होते.
स्विग्गीने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १ लाख २० हजार लोकांनी आयपीएल फायनल पाहताना बिर्याणीची ऑर्डर दिली. “सर्वाधिक ऑर्डर देण्यात आलेल्या पदार्थामध्ये बिर्याणीने बाजी मारल्याचे स्विगीने म्हटले आहे. एका मिनिटाला बिर्याणीच्या २१२ ऑर्डर येत होत्या”. तर अनेकांनी दही, साखरेची ऑर्डर दिल्याची माहिती स्विग्गीने दिली आहे. दरम्यान या पूर्ण हंगामात एकूण 3 लाख 68 हजार 353 जलेबी फाफड्याच्या आर्डर दिल्याची माहिती स्विगीने दिली आहे.
सामन्याशिवाय
आयपीएलच्या सामन्यात व्यत्यय आल्याने अनेकांनी यावेळी इतर गोष्टींमध्येही वेळ घालवल्याचं दिसत आहे. याचं कारण या दरम्यान काही लोकांनी चक्क कंडोमची देखील ऑर्डर दिल्याची माहिती स्विगीने दिली आहे. स्विगी इन्स्टंट मार्टच्या माध्यमातून २४२३ कंडोम्सची डिलिव्हरी करण्यात आली.
IPL Final Match Swiggy Online Order Demand