मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘लाईफ में कुछ भी हो सकता है’ असे आपण म्हणतो. अर्थात तशा प्रकारची चकित करणारी असंख्य उदाहरणे आपल्या डोळ्यापुढे असतात म्हणूनच. आता यात यशस्वी यादव या फलंदाजाचा समावेश झाला आहे. एकेकाळी मुंबईच्या फुटपाथवर पाणीपुरी विकणारा यशस्वी जयस्वाल याने रविवारी आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच झंझावाती शतक ठोकले.
सध्या आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वाल याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. कारण कुठलेही बॅकग्राऊंड नसलेल्या या २१ वर्षाच्या तरुणाने राजस्थानसाठी केलेली शतकी खेळी दिग्गज खेळाडूंच्या भूवया उंचावणारी होती. यशस्वी जयस्वाल आणि त्याचे वडील मुंबईत पाणीपुरी विकायचे. क्रिकेटबद्दल त्याचे प्रेम अख्ख्या मुंबईने अनुभवले आहे. पण एकदिवस तो असा काही चमत्कार करेल, याचा कुणीच विचार केला नव्हता. यशस्वीला राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलसाठी घेतले. रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात यशस्वी होमग्राऊंडवर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळत होता.
राजस्थानने पहिली फलंदाजी करत २१२ धावा केल्या. यातील १२४ धावा एकट्या यशस्वीच्याच आहेत. त्याने १६ चौकार आणि ८ षटकार खेचत केवळ ६२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. याव्यतिरिक्त संघातील इतर सर्व खेळाडूंनी मिळून अवघ्या ६३ धावा केल्या. यशस्वीने सुरुवातीपासून मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करीत होता, ते बघून मुंबई इंडियन्सच्या पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या दिग्गज खेळाडूंनाही आश्चर्य वाटत होते. यशस्वी जयस्वाल याने अत्यंत संघर्षातून क्रिकेटचे करियर घडवले आहे. अजून त्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, पण संघ निवड समितीचे लक्ष त्याने वेधले आहे हे मात्र निश्चित.
https://twitter.com/sagarcasm/status/1652702312971010049?s=20
आयपीएलमधील तिसरे शतक
यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक आहे. पहिले शतक सनरायझर्स हैदराबादचा हेन्री ब्रुक याने झळकावले होते. त्यानंतर कोलकाताचा व्यंकटेश अय्यर याने आणि आता यशस्वी जयस्वाल याने शतक ठोकले. विशेष म्हणजे व्यंकटेश अय्यर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांचीही शतके मुंबई संघाविरुद्धची आणि वानखेडे स्टेडियमवरचीच आहेत.
अॉरेंज कॅपचा मानकरी
रविवारच्या शतकी खेळीनंतर यशस्वी जयस्वाल आयपीएलच्या अॉरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. ही कॅप कालपर्यंत फाफ डु प्लेसिसकडे होती. मात्र आता यशस्वीच्या नावावर ९ सामन्यांमध्ये ४२८ धावा आहेत. तर डु प्लेसिसच्या नावावर ४२२ धावा आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर ४१४ धावांसह कॉनवे आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1652704145978306561?s=20
IPL Cricket Player Yashaswi Jaiswal Success Story