मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – आयपीएल 2022चा हंगाम सुरू झाला आहे. पहिलया तीन दिवसांनीच मोठी रंगत या स्पर्धेत आणली आहे. सहाजिकच क्रिकेटरसिकांना आयपीएल पाहण्याची ओढ लागली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रँचायझींच्या परिचयाने संघांची संख्या 10 झाली आहे. हे सामने कधी आणि कुठे पाहता येतील ते आहोत. ते कोठे थेट प्रक्षेपित होतील आणि कोठून तुम्हाला नवीनतम स्कोअर पाहता येतील.
टीव्ही
IPL 2022 चे सर्व सामने भारतातील स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. IPL 2021 लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात Disney प्लस Hotstar, Jio TV आणि Airtel TV वर उपलब्ध असेल.
थेट प्रक्षेपण
संपूर्ण आयपीएल स्पर्धेचे प्रादेशिक भाषांमध्ये स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगू, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड आणि स्टार स्पोर्ट्स 1 बांग्ला येथे थेट प्रक्षेपण केले जाईल.
प्रादेशिक भाषा
इतर प्रादेशिक भाषेतील प्लॅटफॉर्ममध्ये स्टार स्पोर्ट्स 1 मराठी, स्टार स्पोर्ट्स 1 मल्याळम, सुवर्ण प्लस (कन्नड), जलसा मूव्हीज (बंगाली), माँ मूव्हीज (तेलुगु), स्टार प्रवाह एचडी (मराठी), स्टार गोल्ड, स्टार गोल्ड एचडी यांचा समावेश आहे. , विजय सुपर एसडी, एशियानेट प्लस (रविवारचे सामने).