इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामासाठी लिलावप्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. बंगळुरू येथे १२ आणि १३ फेब्रुवारीला या हंगामात खेळणाऱ्या सर्व दहा संघांनी सहभाग घेतला. यामध्ये ६०० खेळाडूंचा लिलावात समावेश होता. त्यामध्ये २०४ खेळाडूंना खरेदी करण्यात रस दाखवला. या लिलावाची सुरुवात करणारे ब्रिटनच्या ह्यू एडमीड्स यांची प्रकृती बिघडल्याने चारू शर्मा यांनी लिलावाची जबाबदारी पार पाडली.
आयपीएलच्या नव्या हंगामात सहभाग घेण्यापूर्वी दहा संघांनी आपल्या आवडीच्या खेळाडूंवर बोली लावली. १२ आणि १३ फेब्रुवारीला एकूण २०४ खेळाडूंना संघांनी खरेदी करण्यास रस दाखवला. यादरम्यान लिलाव करणाऱ्या चारू शर्मा यांच्याकडून मोठी चूक झाली. चारू शर्मा यांनी भारतीय गोलंदाज खलील अहमद याच्यावर बोली लावताना कोणत्या संघाने मोठी बोली लावली हे सांगताना त्यांच्याकडून चूक झाली. खलील याच्यावर मुंबई इंडियन्सने बोली लावली. परंतु चारू शर्मा यांच्या चुकीमुळे तो खेळाडू त्यांना मिळाला नाही. मुंबईने बोली लावलेली असताना खलीलला दिल्लीच्या संघात जाऊ दिले. दिल्लीने खलीलवर ५ कोटी रुपये लावले. त्यानंतर मुंबईने ५.२५ कोटी रुपयांची बोली लावली आणि चारू शर्मा यांनी पुन्हा दिल्लीकडे पाहिले. दिल्लीच्या संघाने पॅडल उंचावले परंतु पुन्हा मागे घेतले. मुंबईने ५.२५ कोटी रुपयांची जास्त रकमेची बोली लावलेली असतानाही चारू शर्मा यांनी खलीलचा दिल्लीच्या संघात समावेश केला.
https://twitter.com/addicric/status/1493204701881323526?s=20&t=Q0N-vAUlagR-BTf_ac-onQ